TOI
देश विदेश

Chandigarh Express Accident Video: गोरखपूरला जाणाऱ्या डिब्रूगढ़ चंदीगड एक्स्प्रेसचा मोठा अपघात; अनेक डबे रुळावरुन घसरले

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रेल्वे अपघात झालाय. चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या १५९०४ एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरलेत. या अपघातात अनेकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड एक्स्प्रेसला अपघात झालाय. चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरुन घसरलेत. या अपघातात अनेकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी आतापर्यंत दोन-तीन मृतदेह दिसले आहेत. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वेचे सहा डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या आहेत.

या घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओही समोर आलेत. ज्यामध्ये एसी कोच उलटलेला डबा दिसतोय. अशा परिस्थितीत प्रवासी आत अडकले आहे. त्यामुळे जखमी आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार, २ प्रवाशांचा मृत्यू झालाय. तेथील स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचून जिल्हा प्रशासन आणि रेल्वे टीमला मदतकार्यात मदत करत आहेत. एसी डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडून लोकांना बाहेर काढले जातंय.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडामधील रेल्वे अपघाताची माहिती घेतलीय. मुख्यमंत्री योगींनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य त्वरीत करण्याच्या सूचना दिल्यात. सीएम योगी यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्यात. यासह त्यांनी जखमींना त्वरीत उपचार द्यावेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केलीय.

रेल्वे अपघाताबाबत हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आलाय. ईशान्य रेल्वेच्या लखनऊ विभागाने डिब्रुगढ एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानंतर हेल्पलाइन क्रमांक जारी केलेत. व्यावसायिक नियंत्रण- 9957555984, फुर्केटिंग (FKG)- 9957555966, मारियानी (MXN)- 6001882410, सिमलगुरी (SLGR)- 8789543798, तिनसुकिया (NTSK)- 9957555959, दिब्रुगड (DBRG)- 995755569.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : अजित आगरकरची हक्कालपट्टी? निवड समितीच्या अध्यक्षपदी रवी शास्त्रींची नियुक्ती होणार?

Maharashtra Live News Update: निलेश गायवळला पासपोर्टसाठी मदत करणाऱ्या "त्या" एजंटची चौकशी होणार

Afternoon Sleep: दुपारची झोप घेणं शरीरासाठी फायदेशीर की घातक? तज्ज्ञांनी नेमका काय सल्ला दिला?

CBSE Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर, कुठे चेक कराल?

Shivajirao Kardile: दूधवाल्याचा पोरगं ते मंत्री, कोण होते भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले?

SCROLL FOR NEXT