Saudi arabia bus Crash Saam tv
देश विदेश

Shocking : क्षणात सर्व काही संपलं! सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू

Saudi arabia bus Crash : सौदी अरेबियातील भीषण अपघात एकाच कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने तेलंगणातील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

सौदी अरेबियातील बस-टँकर भीषण अपघातात ४५ भारतीयांचा मृत्यू

हैदराबादमधील एकाच कुटुंबातील १८ सदस्यांचा मृत्यू

बस मक्का ते मदिना प्रवासात असताना डिझेल टँकरला धडकल्याने घडला अपघात

नसीरुद्दीन आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब घटनेत मृत्युमुखी

सौदी अरेबियातील बसच्या भीषण अपघाताने जगभरात खळबळ उडाली आहे. डिझेल टँकर आणि बसच्या अपघातात ४५ भारतीय प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. भारताला हादरवणाऱ्या या अपघातात एका कुटुंबाच्या तीन पिढ्यांचा अंत झाला. घरातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला.

बसमधील प्रवासी मक्का येथून मदिना येथे जात होते. सर्व कुटुंबीय घरी परतण्याचा विचार करत होते. लहान मुल आणि आजोबा-आजींची बसमध्ये गप्पा सुरु होत्या. डिझेल टँकर आणि बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बसने पेट धरला.

अपघातात मृत पावलेल्या नागरिकांमध्ये हे हैदराबादमधील रहिवासी होते. हैदराबादमधील शेख नसीरुद्दीन आणि त्यांची पत्नी अख्तर बेगम हे देखील बसमध्ये होते. त्यांच्यासोबत दोन मुलं, दोन मुली, सून आणि इतर नातेवाईक बसमध्ये होते.

सौदी अरेबियाला न गेलेल्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीरुद्दीन हे मागील काही दिवसांपासून तयारी करत होते. मक्का-मदिनाला जाण्यासाठी सर्वजण खूश होते. मात्र, आज अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे'.

पीडित कुटुंबातील सदस्यांचा चुलत भाऊ मोहम्मद असलम यांनी सांगितले की, 'आमच्या कुटुंबातील १८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आमची सरकारला विनंती आहे की, अपघातात जबाबदार असलेल्यांना शिक्षा मिळाली पाहिजे.

नातेवाईकांनी सांगितलं की, 'मुले पहिल्यांदा सौदीला गेल्याने आनंदात होते. कुटुंबातील सर्व जण खूश होते. तेलंगणा राज्याच्या हज कमिटीचे अध्यक्ष गुलाम अफजल बियाबानी यांनी सांगितलं की, 'आमचं खासगी संचालकावर कोणतंही नियत्रंण नाही. आम्ही पीडित कुटुंबाची मदत करू. आताचा संपूर्ण काळ कठीण आहे. आमच्या पीडित कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर! गरोदर महिलेच्या पोटावर लाथ मारली, क्षुल्लक वादामुळे जन्माला येण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना चूक झालीय? फक्त २ मिनिटांत करा दुरूस्ती; फॉलो करा ही प्रोसेस

Social Media Ban: भारतातही १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी करावी का? नेटकऱ्यांचं मत काय? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: थार, फॉर्चूनर सारख्या महागडा स्पोर्ट कारवर वाहतूक पोलिसांची कारवाई

Dhurandhar: 'असे चित्रपट कधी कधी...'; धुरंधर चित्रपटाच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT