प्रयागराजमधील महाकुंभावरून परतताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. जयपूर बायपासवर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर हसत्या खेळत्या कुटुंबावर डोंगर कोसळला.
महाकुंभात पवित्र स्नान करून परतताना भाविकांची कार ट्रेलरला धडकली. या भीषण अपघातानंतर भाविकांचा एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.
महाकुंभमेळ्यातील भाविक महामार्गावरून कारने परतत होते. त्यावेळी या भाविकांची कार उभ्या ट्रेलरला धडकली. दोन दाम्पत्यांसहित पाच जणांचा मृत्यू झाला आहे. टोंक जिल्ह्याच्या दवेली येथे राहणारे भाविक प्रयागराजच्या महाकुंभातून परतत होते. त्यांच्या कारच्या अपघात झाला. अपघातात कारच्या चिंधड्या उडाल्या.
भीषण अपघातात मुकुट बिहारी सोनी, त्याची पत्नी गुड्डी देवी, राकेश सोनी आणि त्याची पत्नी निधी, कार चालक नफीस खान यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील दीपेश सोनी, ट्रेलर चालक धर्मवीर, मिस्त्री रामचरण जखमी झाले. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अपघातानंतर पोलीस सतर्क झाले. गॅस लीक होण्याच्या भीतीने वाहतूक रोखण्यात आली. पोलिसांनी अपघातानंतर दुर्घटनाग्रस्त वाहनांना एका बाजूला ठेवून वाहतूक सुरु ठेवली. दोसा जिल्ह्यातील रुग्णालयात ५ जणांच्या मृतदेहाची पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दौसाचे डीएसपी रवी शर्मासहित इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अपघाताचं कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.
धाराशिवातील उमरगा तालुक्यातील माडज पाटी येथे पिकअप आणि मोटर सायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दिंगबर कांबळे, आकाश रामपुरे, दीपक रामपुरे यांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.