Crime News: हुंडा देऊनही २५ लाखांची मागणी, सासरच्यांनी तरूणीला HIV संक्रमित इंजेक्शन टोचलं, गुन्हा दाखल

Dowry Harassment Case in Saharanpur: सासरच्यांची हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी सुनेला चक्क एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचलंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Crime News
Crime NewsAI Photo
Published On

सासरच्यांची हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी सुनेला चक्क एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचलंय. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. पीडित तरूणीची प्रकृती गंभीर असून, तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी मुलगी सोनल हिचा विवाह १५ फेब्रुवारी २०२३ साली उत्तराखंडमधील हरिद्वार येथील अभिषेकशी झाला होता. लग्नात त्यांनी हुंड्यात रोख रक्कम, दागिने आणि कार दिली होती. तरी देखील सासरच्या मंडळींकडून २५ लाख रूपये आणि एक चारचाकी वाहनाची मागणी केली जात होती.

Crime News
Solapur News: चालक दारूच्या नशेत, एसटी बसचा भीषण अपघात, ७-८ जणांची प्रकृती गंभीर

पीडितेच्या कुटुंबाने या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून सासरच्या मंडळींनी पीडित तरूणीला घराबाहेर हाकलून लावले. पंचायतीने नंतर तरूणीला तिच्या सासरच्या घरी पाठवले. या काळात तिच्या सासरच्या मंडळींनी सोनलचा जाच केला आणि तिला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन टोचले. तसेच तिला मारण्याचाही प्रयत्न केला.

Crime News
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचं काम झालं, त्यांचा एक गट भाजपात जाणार; ठाकरेंच्या नेत्याच्या खळबळजनक दावा

तरूणीची तब्येत बिघडल्यानंतर, तिच्या पालकांनी तिला रूग्णालयात दाखल केलं. रूग्णालयात दाखल केल्यानंतर तिची तपासणी केली. तेव्हा तरूणी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आले. पालकांनी नंतर पोलीस ठाण्यात जात सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. नंतर न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर, ११ फेब्रुवारीला गंगोह पोलीस ठाण्यात सोनलचा पती आणि मेहुण्यासह ४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com