Bhiwandi Crime: वाद उत्तर प्रदेशमध्ये, भिवंडीत घेतला बदला, गर्लफ्रेंडच्या मदतीने फसवलं अन् घेतला जीव

Mumbai Crime Updates: उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून तरूणाची भिवंडीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कट रचत ४ आरोपींनी तरूणाचा लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून हत्या केली आहे.
Bhiwandi
BhiwandiSaam Tv News
Published On

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून तरूणाची भिवंडीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वादाचा राग मनात धरून ५ जणांनी तरूणाच्या हत्येचा कट रचला. प्रेमाच्या जाळ्यात ओढत प्लान प्रमाणे त्याची दगडाने ठेचत निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणात ५ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रम इकबालुद्दीन कुरेशी (वय वर्ष २२) असं मृत तरूणाचे नाव आहे. हा जोगेश्वरी येथे स्थायिक होता. तो ओला चालकाची गाडी घेऊन प्रेयसीच्या म्हणण्यानुसार भिवंडी पोलीस ठाणे हद्दीतील पोगाव गावाजवळ आला. त्यानंतर अज्ञात ४ व्यक्तींनी लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली.

Bhiwandi
Navi Mumbai: नवी मुंबईचा सातवी पास नटवरलाल, २१ जणांना तब्बल २७ लाखांना गंडवलं

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात मृत तरूण महिलेसोबत येताना दिसत आहे. पोलिसांनी तपास करत तरूणीचा शोध घेत ताब्यात घेतलं आहे. तिची चौकशी केली असता, तिने घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रम कुरेशी या तरूणाचे २०२२ साली आरोपींसोबत वाद झाला होता. जमिनीचा वाद हा प्रतापगड उत्तर प्रदेश येथे झाला होता. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अक्रमच्या हत्येचा कट रचला.

Bhiwandi
Nandurbar Hit and Run: वाढदिवसाच्या दिवशीच काळाचा घाला, फॉर्च्यूनरनं आई - मुलाला चिरडलं, नंदुरबारात हीट अँड रन

अक्रम याची हत्या करण्यासाठी मुख्य आरोपी मोहम्मद कैफने आपली प्रेयसी जस्सी तिवारीची मदत घेतली. तिने अक्रमसोबत प्रेमाचे नाटक केले. नंतर जस्सीने कट रचल्याप्रमाणे अक्रमला भिवंडी येथील नियोजित स्थळी बोलावून घेतलं. त्याठिकाणी आधीच ४ आरोपी दबा धरून बसले होते. अक्रम येताच त्यांनी लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपासाला सुरूवात केली. आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. तसेच मोहंमद कैफ, इसामुद्दिन रियाजुद्दिन कुरेशी, सलमान मो. शफिक खान, सुहेल अहमद कुरेशी या आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून शिताफिने अटक केलं. या प्रकरणाचा अधिक तपास भिवंडी तालुका ग्रामिण पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com