Navi Mumbai: नवी मुंबईचा सातवी पास नटवरलाल, २१ जणांना तब्बल २७ लाखांना गंडवलं

Seventh Grade Dropout Investment Scam: वाशी येथे एक धक्कादायक घटना धडली आहे. एका सातवी पास व्यक्तीनं अधिक नफ्याचे आमिष दाखवत २७ लाख रूपये उकळले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Vashi
VashiSaam Tv News
Published On

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

सातवी पास एका भामट्यानं चक्क २१ जणांना २७ लाख रूपयांना गंडा घातला आहे. या भामट्यानं बोल्टकॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनीची स्थापना केली. दर महिन्याला ९ टक्के परताव्याचे आमिष दाखवून तो लोकांना लुबाडत होता. यात अनेक जणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी डमी गुंतवणूकदार पाठवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नवी मुंबईच्या वाशी येथे एक धक्कादायक घटना धडली आहे. एका सातवी पास व्यक्तीनं अधिक नफ्याचे आमिष दाखवत २७ लाख रूपये उकळले आहेत. भोलाकुमार असं आरोपीचे नाव आहे. त्याने वाशी येथे बोल्टकॅब मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. कंपनी सुरू करून त्याने लोकांना अधिक नफ्याचे आमिष दाखवले.

Vashi
Viral News: 'आज आपल्या लग्नाची पहिली रात्र' तरूणानं फेसबुकवर फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले 'आता व्हिडिओ पाठवा'

दर महिन्याला ९ टक्के परताव्याचे आमिष दाखवून त्याने अनेक लोकांना लुबाडले. तब्बल २१ जणांना त्याने २७ लाख रूपयांना लुबाडले आहे. नागरीकांची फसवणूक केल्यानंतर भोलाकुमार पैसे घेऊन फरार होण्याच्या तयारीत करत होता. तो पैसे घेऊन बँकॉकला जात होता.

Vashi
Crime News: हुंडा देऊनही २५ लाखांची मागणी, सासरच्यांनी तरूणीला HIV संक्रमित इंजेक्शन टोचलं, गुन्हा दाखल

मात्र, यापूर्वीच पोलिसांनी आरोपी भोलाकुमारच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलीसांनी एक डमी गुंतवणूकदार भोलाकुमारच्या कंपनीत पाठवले. नंतर त्याने अनेक लोकांना आमिष दाखवत लोकांना गंडवलं असल्याचं समोर आलं. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष एक अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com