Infertility treatment: गर्भधारणेमध्ये अडथळा येत असलेल्या महिलांसाठी 'ही' थेरेपी ठरेल आशेचा किरण; पाहा काय आहे ही थेरेपी?

Ovarian Rejuvenation Therapy: आजकाल अनेक महिलांना विविध कारणांमुळे आई होण्यास अडचणी येतात. यामध्ये सर्वात प्रमुख कारण म्हणजे वयानुसार अंडाशयातील अंडी कमी होणे किंवा त्यांची गुणवत्ता घटणे.
Ovarian Rejuvenation Therapy
Ovarian Rejuvenation Therapysaam tv
Published On

प्री मॅच्युअर ओव्हरीयन इनसफिशीयन्सी ही तरुणींमधील प्रजनन क्षमता आणि एकूणच हार्मोनल आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे महिलांनी याकडे दुर्लक्ष करू नये. ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी म्हणजे नेमकं काय त्याची कारणं, लक्षणं आणि फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

पुण्यातील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. निशा पानसरे यांनी सांगितलं की, प्री मॅच्युअर ओव्हरीयन इनसफिशीयन्सी ही समस्या तेव्हा उद्भवते ज्यावेळी एखाद्या महिलेचं अंडाशय 30-35 वर्षांच्या आधी सामान्यपणे कार्य करणं थांबवतं. यामुळे अनियमित मासिक पाळी किंवा मासिक पाळीचे चक्र थांबणं, कमी इस्ट्रोजेन पातळी आणि अगदी वंध्यत्वाची समस्या उद्भवते. रजोनिवृत्ती साधारणपणे ४५ ते ५५ वयोगटात येते.

डॉ. पानसरे पुढे म्हणाल्या की, परंतु अशी समस्या असलेल्या महिलांना त्यांच्या प्रजनन क्षमता आणि हार्मोन उत्पादनात बदल खूप लवकर किंवा अनेकदा कोणत्याही लक्षणांशिवाय दिसून येतो. ही स्थिती भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकते. विशेषतः ज्या महिला गर्भधारणा करू इच्छितात आणि मातृत्वाची इच्छा आहे त्यांना यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यासाठी पारंपारिक उपचार हे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) वर लक्ष केंद्रित करतात. महिलांना प्रजनन क्षमता पूर्वीप्रमाणे करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या वंध्यत्व निवारण तज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Ovarian Rejuvenation Therapy
Stroke warning signs: स्ट्रोक येण्याच्या 1 महिना आधी शरीरात होतात 'हे' मोठे 5 बदल; लक्षण ओळखून वेळीच डॉक्टरांकडे जा

प्री मॅच्युअर ओव्हरीयन इनसफिशीयन्सी हे अनुवांशिक घटकांमुळे, स्वयंप्रतिकार रोगांमुळे, काही संसर्गांमुळे, कॅन्सरच्या उपचारांमुळे किंवा ज्ञात कारणांशिवाय उद्भभवू शकते. यावेळी महिलांमध्ये हॅाट प्लॅश, रात्री घाम येणं, मूड स्विंग्ज, योनीमध्ये कोरडेपणा आणि गर्भधारणेत अडचणी येणं या लक्षणांचा समावेश आहे.

महिलांमध्ये प्री मॅच्युअर ओव्हरीयन इनसफिशीयन्सीसाठी उपचार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीच्या स्वरूपात असू शकतात. जेणेकरून लक्षणं मॅनेज केली जाऊ शकतील आणि हाडे आणि हृदयाचं आरोग्य संरक्षित केलं जाईल.

Ovarian Rejuvenation Therapy
Waking up 3 to 5 am: दररोज पहाटे ३ ते ५ दरम्यान जाग येतेय? आरोग्याबाबत शरीर देतंय गंभीर संकेत, वाचा

ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी

अंडाशयांची अंडी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांचं Revival करणं याला “ओव्हेरियन रिजुवेनेशन” म्हणतात. सध्या प्री मॅच्युअर ओव्हरीयन इनसफिशीयन्सीचं निदान झालेल्या महिलांमध्ये प्रजनन क्षमता पूर्वीसारखी करण्यासाठी ओव्हेरियन रिजुवेनेशन थेरपी पर्याय वापरला जातो. अद्याप प्रायोगिक टप्प्यात असताना, या थेरपीमध्ये प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (PRP) इंजेक्शन्स, स्टेम सेल थेरपी आणि इन-व्हिट्रो अ‍ॅक्टिव्हेशन सारख्या तंत्रांचा समावेश आहे. जे निष्क्रिय फॉलिकल्सना उत्तेजित करू शकतात आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात.

जेव्हा पीआरपी थेरपीचा विचार केला जातो तेव्हा, महिलेच्या रक्तातून वाढीच्या घटकांनी समृद्ध प्लेटलेट्स काढण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. जी नंतर ऊतींची दुरुस्ती आणि सक्रियता वाढवण्यासाठी अंडाशयात इंजेक्ट केली जाते.

Ovarian Rejuvenation Therapy
Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

प्री मॅच्युअर ओव्हरीयन इनसफिशीयन्सी आशादायक असली तरी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ती अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. याशिवाय ती प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नाही. ती क्लिनिकल चाचण्यांचा एक भाग आहे. प्री मॅच्युअर ओव्हरीयन इनसफिशीयन्सी असलेल्या महिलांसाठी ज्यांच्याकडे कमी पर्याय आहेत, अशा महिलांसाठी ही प्रगती आशेचा एक नवीन किरण ठरते. संशोधन जसजसं पुढे जाईल तसतशी ही थेरपी आणखी नवीन शक्यता निर्माण करु शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com