Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, ट्रकच्या धडकेनंतर कारने घेतला पेट; ११ जण जिवंत जळाले

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या अपघातानंतर कारने पेट घेतला. या आगीत होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • मिर्झापूरमध्ये भीषण रस्ते अपघात

  • ट्रकच्या धडकेनंतर कारने घेतला पेट

  • ११ जणांचा जिवंत जळून मृत्यू

  • ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे झाला अपघात

उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये बुधवारी रात्री घडली. ड्रमंडगंजच्या बरका मुदनजवळ भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की कारने पेट घेतला. या आगीमध्ये होरपळून ११ जणांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यात आली पण कारमधील एकालाही वाचवण्यात यश आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातून हरभरा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकने कारला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर कारने पेट घेतला. आग लागल्यानंतर कारमधील प्रवासी बाहेर पडणार तोपर्यंत भडका उडाला आणि संपूर्ण कार आगीचा गोळा बनली. या कारमध्ये असलेले प्रवासी जिवंत जळाले. कारमधील प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. ते मदतीसाठी आवाहन करत होते पण आग इतकी भयंकर होती की कुणीच मदत करू शकले नाही.

पोलिस अधीक्षक अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव ट्रकने कारला धडक दिली. या ट्रकने आधी अनेक वाहनांना धडक दिली. त्याने दुसऱ्या ट्रकला धडक दिली, ज्यामुळे अल्टो कार दोन्ही ट्रकमध्ये अडकली. त्यानंतर या ट्रकने एका बोलेरोला धडक दिली. या धडकेनंतर बोलेरो कारला आग लागली आणि प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर बोलेरोमधील प्रवाशांना बाहेर येण्याची संधी मिळाली नाही. त्या सर्वांचा कारमध्येच जळून मृत्यू झाला. मृतदेहांचा कोळसा झाला त्यामुळे मृतांची ओळख पटवणंही कठीण झाले आहे. गावकऱ्यांनी बोलेरोमधील आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग इतकी भीषण होती की गावकरी तिच्या जवळही जाऊ शकले नाहीत. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आग कशीबशी विझवण्यात आली. आतापर्यंत गाडीतून ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : मीठ अन्...; 'हे' ५ पदार्थ हाय BP च्या रुग्णांसाठी खूपच घातक

शिंदेंच्या आमदाराची गुंडगिरी कधी थांबणार? छत्रपती शिवरायांचा आदर करताना जीभ घसरली, ऑडिओ क्लिप व्हायरल

Nashik Crime: खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचं कांड, विधी करण्याच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

Shocking : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर अपहरण करून डांबून ठेवलं; लग्न करण्यासाठी तरुणाचं संतापजनक कृत्य

Mumbai Metro 5A: आनंदाची बातमी! लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, उल्हासनगरपर्यंत धावणार 5A मेट्रो; कधीपर्यंत होणार सुरू?

SCROLL FOR NEXT