

पहिल्याच पावसात पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली. त्यामुळे मुंबईत पाणी साठलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे थेट ग्राऊंडवर उतरल्या. मात्र महापौरांसमोरच महापालिकेचा कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्यानं पालिकेच्या कारभाराची कशी पोलखोल झाली ? मॅनहोल मुंबईकरांसाठी कसे जीवघेणे ठरतायत ? पाहूयात या रिपोर्टमधून.
ही दृष्य जरा नीट पाहा,
मुंबईत झालेल्या पावसात एक माणूस एका खड्यात कसा पडला ते पाहा, नीळे कपडे घातलेला हा माणूस कंबरेइतक्या पाण्यानं तुंबलेल्या या खड्यात पडला, त्या माणसाला प्रसंगावधान राखत तिथं असलेल्या लोकांनी तातडीनं बाहेर काढलं. म्हणून त्याचा जीव वाचलाय. पण त्या खड्याच्या शेजारी लागलेला हा पिवळा सूचना बोर्ड पाहा, त्यावर लिहिलंय.
खबरदारी अतिउच्च वीजदाब म्हणजे या भागात उतिउच्च दाबाची वीज वाहीनी आहे. ही दृष्य मुंबई महापालिकेच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगणारी आहेत याच दृष्यांमध्ये पुढे दिसतायेत मुंबईच्या महापौर रितू तावडे. त्यांनी हा माणूस पुढे आल्यानंतर लगेलच त्या खड्यांची पाहणी केली पण तो खड्डा नव्हता तर तो होता. आणि त्यात पडलेला बीएमसीचा कर्मचारी
मुंबई महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे बीएमसीच्या कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्यात आलाय तर सामान्य मुंबईकरांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच केलेली बरी. आणि याच बीएमसीचं अपयश हे महापौरांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. ज्या बीएमसीवर मुंबईकरांना सुविधा देण्याची जबाबदारी आहे त्याच कामाची पहिल्याच पावसात पोलखोल झाली यानंतर अशी बोगस कामं करणाऱ्या अधिकाऱ्यांना महापौरांनी इशारा दिला. तर मुंबई महापालिकेच्या कामावरुन महापौरांचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला.
या घटनेनंतर साम टीव्हीनं ग्राऊंड रियालिटी जाणून घेतली तेव्हा धक्कादायक चित्र समोर आलं. मुंबईतल्या अंधेरी परिसरात एक उघडं मॅनहोल्स सामच्या कॅमेऱ्यात कैद झालं. अंधेरी सबवे परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारांची झाकणं थेट उघडी करून सोडून देण्यात आली. साम टीव्हीनं याचा पर्दाफाश केल्यानंतर कुठे सुस्त प्रशासनाला तात्पुरती जाग आली आणि याठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या.
मुंबईच्या मॅनहोलमध्ये पडून आजवर अनेकांचा मृत्यू झालाय. हे विसरून चालता येणार नाही.
ऑगस्ट 2017
डॉ. दीपक अमरापूरकर
जुलै 2019
दिव्यांश सिंग
ऑक्टोबर 2020
शीतल भानूशाली
सप्टेंबर 2024
विमल गायकवाड
मुंबईत मॅनहोलच्या निष्काळजीपणामुळे गेलेले हे जीव केवळ आकडे नाहीत. ही मुंबई महापालिकेच्या बेफिकीरीची रक्तरंजित नोंद आहे. दरवेळी दुर्घटना घडते, चौकशीचे आदेश निघतात आणि संबंधितांवर जुजबी कारवाई करून फाईल बंद केली जाते. त्यामुळे याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची गरज आहे.
नाहीतर आज कर्माचीर मॅनहोलमध्ये पडला. उद्या सामान्यांसारखाच नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचाही पाय या खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.