Bihar Accident  Saam Tv
देश विदेश

Accident News: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! श्राद्धावरून परत येताना अनर्थ घडला; कार तलावात कोसळून नवरा-बायकोसह २ मुलांचा करूण अंत

Bihar Car Accident: बिहारमध्ये कार तलावात कोसळून एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्राद्धाला जाऊन घराकडे परत येत असताना हा अपघात झाला. कारमधून बाहेर पडता न आल्यामुळे चौघांनाही जीव गमवावा लागला.

Priya More

बिहारच्या गयामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये नवरा-बायको आणि दोन मुलांचा समावेश आहे. नातेवाईकाच्या श्राद्धाला जाऊन घराकडे परत येत असताना हा अपघात झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटून ही कार थेट तलावात कोसळली. सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गयामधील दखिनगांव बायपासजवळ हा भीषण अपघात झाला. कारमध्ये असलेल्या चौघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. तर कार चालक या अपघातामध्ये सुदैवाने बचावला.

खिजरसरायनजीकच्या शाहबाजपूर येथे राहणारे शशिकांत शर्मा (४० वर्षे), त्यांची पत्नी रिंकी देवी (३८ वर्षे), त्यांचा मुलगा सुमित कुमार (७ वर्षे) आणि छोटा मुलगा बालकृष्ण (९ वर्षे) या चौघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह आणि कार तलावाच्या बाहेर काढली. घटनेची माहिती मिळताच शर्मा कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला.

कारचालक टिंकू कुमार हा काल तलावात पडल्यानंतर कसा तरी पोहत बाहेर आला. तलावाबाहेर आल्यानंतर तो वाचवा वाचवा असे ओरडत होता. चालकाचा आवाज ऐकून नजीकच्या हॉटेलच्या मालकाने लगेच गावातील नागरिकांना आणि पोलिसांना सांगितले. तात्काळ सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत उशिर झाला होता. कारण चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. पोलिसांनी आणि स्थानिकांनी जेसीबीच्या सहाय्याने कार तलावा बाहेर काढली. पाण्यामध्ये गुदमरून चौघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातामध्ये मृत्यू झालेले शशिकांत शर्मा हे या परिसरातील एक प्रमुख शेतकरी होते. त्यांचा मोठा मुलगा सुमित राजकारणात सक्रिय होता. भाजपचा पदाधिकारी म्हणून त्याची ओळख होती. घटनेची माहिती मिळताच शशिकांत शर्मा यांच्या आईची प्रकृती बिघडली. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे ते राहत असलेल्या गावावर शोककळा पसरली. एकाच वेळी चौघांवर देखील अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT