बारावीतील ५ विद्यार्थ्यांचा फाल्गु नदीत बुडून मृत्यू झाला.
हे विद्यार्थी परीक्षा दिल्यानंतर नदीत पोहायला गेले होते.
पाचही जण एकाच गावातले असल्याचे म्हटले जात आहे.
Five Students Died after Drowned : एका दुर्दैवी अपघातामध्ये पाच शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना बिहारमधील गयाजी जिल्ह्यात घडली आहे. फाल्गु नदीमध्ये बुडून बारावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना बिहारच्या गयाजी जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील बेलागंज आणि खिजरासराईच्या सीमेवरील फाल्गु नदीत ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी पनारी हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा दिल्यानंतर फाल्गु नदीत आंघोळीसाठी गेले होते. सर्वजण बेलागंजमधील वाजितपूर गावातील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सुमारे १३ किशोरवयीन मुले नदीत अंघोळ करत होते. पाण्यात बुडताना आठ जणांना वाचवण्यात आले. पण पाच जण खोल पाण्यात गेले. कठोर प्रयत्नांनंतर त्यांना बेशुद्धावस्थेत वाचवण्यात आले. सर्व किशोरवयीन मुलांना खिजरासराई प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. तेथून त्यांना उच्च केंद्रात पाठवण्यात आले.
आतापर्यंत पाच मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांचा गयाजी येथील मगध मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. उर्वरित तिघांचा इतर रुग्णालयात मृत्यू झाला. हे सर्वजण खोल पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नव्हता. पाण्यात बुडून ते बेशुद्ध झाले आणि उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडले असे पोलिसांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.