Shocking Incident
Shocking Incidentx

Shocking : अजबच! तरुणाच्या पोटात २९ स्टीलचे चमचे आणि १९ टूथब्रश, ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनाही बसला धक्का

Shocking Incident : पोटात दुखत असल्याने एका तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. तपासादरम्यान त्याच्या पोटात स्टीलचे चमचे, टूथब्रश अशा गोष्टी आढळून आल्या. ऑपेरशनद्वारे हे सामान काढण्यात आले.
Published on
Summary
  • ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी तरुणाच्या पोटातून २९ चमचे आणि १९ टूथब्रश बाहेर काढले.

  • ड्रग्सच्या व्यसनामुळे व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाने रागातून या वस्तू गिळल्या होत्या.

  • डॉक्टरांनी वेळेत शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून वस्तू काढल्या आणि त्याचा जीव वाचवला.

Shocking News : पोटात तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर एका तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरही थक्क झाले. डॉक्टरांनी तरुणाच्या पोटात तब्बल २९ स्टीलचे चमचे आणि १९ टूथब्रश काढले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील हापूर येथील देव नंदिनी रुग्णालयात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी या सर्व गोष्टी ऑपरेशनमधून बाहेर काढल्या, त्या तरुणाचे नाव सचिन असे आहे. या सचिनला ड्रग्सचे व्यसन होते. या व्यसनामुळे त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असे. कुटुंबियांनी सचिनला एका व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. सचिनला हे आवडले नाही. रागाच्या भरात त्याने व्यसनमुक्ती केंद्रातील स्टीलचे चमचे, टूथब्रश गिळायला सुरुवात केली.

Shocking Incident
Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

व्यसनमुक्ती केंद्रात मिळणाऱ्या मर्यादित जेवणामुळे सचिनला त्रास होत असे. हळूहळू त्याच्या पोटात तीव्र वेदना व्हायला सुरुवात झाली. त्याची तब्येत बिघडली. वेदना असह्य झाल्याने तो डॉक्टरांकडे गेला. तपासणीदरम्यान, डॉक्टरांना सचिनच्या पोटात मोठ्या प्रमाणात धातूसारख्या वस्तू आढळल्या. यामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला.

Shocking Incident
Video : तिरुपती मंदिरात १०० कोटींच्या चोरी प्रकरणात खळबळजनक खुलासा, CCTV फुटेजमध्ये चोरी करताना दिसला अधिकारी

देव नंदिनी रुग्णालयाचे डॉ. श्याम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला जेव्हा आणले तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी सांगितले की तो व्यसनमुक्ती केंद्रात चमचे आणि टूथब्रश खात असे. तपासणीनंतर आम्ही ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या एका पथकाने ऑपरेशन केले आणि सचिनच्या पोटातून २९ स्टीलचे चमचे, १९ टूथब्रश काढले. या प्रकारची समस्या अनेकदा मानसिक समस्या असलेल्या लोकांमध्ये दिसून येते. वेळेवर ऑपरेशन केल्याने रुग्णाचे प्राण वाचले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो वैद्यकीय देखरेखीखाली आहे.

Shocking Incident
Kalyan Crime : कल्याण हादरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ८ जणांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com