SMS हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याची घटना
८ जणांचा मृत्यू, ५ जण जखमी
प्रत्यक्षदर्शीनं दिली महत्वाची माहिती
राजस्थानची राजधानी जयपूरमधील एसएमएस हॉस्पिटलमध्ये आग लागली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास आयसीयूमध्ये आग लागल्यानं गोंधळ उडाला होता. रूग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये आग लागली होती. यानंतर रूग्ण आणि नातेवाईकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला. या भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. तर, ५ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
रात्री साडेअकरा वाजता लागली आग
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील न्यूरो वॉर्ड स्टोअरमधून रात्री ११ वाजून १० मिनिटांनी धूर येऊ लागला. रूग्णांनी तातडीने रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली होती. परंतु, तोपर्यंत धूर वेगाने पसरला होता. त्यानंतर काही वेळातच आयसीयूमध्ये आग दिसू लागली होती. ज्वाला पाहून रूग्ण भयभीत झाले.
आयसीयूमध्ये आग शॉर्ट सक्रिटमुळे लागल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. फायर अलार्म वाजताच रूग्णालयातील कर्मचारी आणि परिचारक घाबरले. त्यांनी रूग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. रूग्णालय व्यवस्थापनाने इतर वॉर्डमधून रूग्णांना हलवण्यास सुरूवात केली.
तर, रूग्ण आणि नातेवाईकांनी सामान घेऊन रूग्णालयाच्या बाहेरच्या दिशेनं पळ काढला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बऱ्याच प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. यानंतर संपूर्ण ट्रॉमा सेंटर रिकामे करण्यात आले. काही रूग्णांना श्वास घेण्यात अडचण झाली होती. त्यांना तातडीने वॉर्ड आणि आपत्कालीन विभागात हलविण्यात आले.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले?
प्रत्यक्षदर्शीने या आगीत आपल्या नातेवाईकाला गमावले, त्यांनी सांगितले की, 'तो माझ्या मावशीचा मुलगा होता. तो २५ वर्षांचा होता. रात्री साडेअकराच्या दरम्यान धूर येऊ लागला. धूर हळूहळू वाढत गेला. रूग्णांना बाहेर काढण्यात आले. मात्र, काही रूग्णांना बाहेर काढताना अडचणींचा सामना करावा लागला. चार - पाच रूग्णांना बाहेर काढण्यात आले. माझ्या मावशीचा मुलगाही तिथे होता. तो पूर्णपणे ठीक झाला होता'.
'त्याला १-२ दिवसांत डिसार्ज देण्यात येणार होते. मात्र आगीच होरपळून त्याचा मृत्यू झाला.' या घटनेनंतर आठ रूग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. तर, अनेक जण गंभीर जखमी स्थितीत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.