
घरात पाली अन् झुरळांचा वावर.
केमिकल प्रॉडक्ट वापरणं सोडा.
घरी तयार करा लिक्विड.
प्रत्येक घरात पाली आणि कॉकरोचचा वावर असतोच. कितीही सफाई करा, खिडकी उघडी असल्यावर घरात पाली आणि कॉकरोच शिरतात. पाली आणि झुरळांना पळवून लावण्यासाठी आपण काही टिप्स फॉलो करतो. मात्र, काही टिप्स फेल ठरतात. जर विविध उपाय करूनही झुरळं आणि पाली घर सोडून पळ काढत नसतील, तर एक घरगुती उपाय करून पाहा. मिनीटात घर होईल स्वच्छ.
अलिकडेच इन्स्टाग्रामवर कंटेट क्रिएटर प्राजक्ताने घरगुती टिप शेअर केली आहे. यात तिने पाली आणि झुरळांना कसं पळवून लावायचं? याबाबत टिप शेअर केली आहे. यासाठी आपल्याला जास्त खर्च करण्याची गरद नाही. मोजक्या साहित्यात घरगुती स्प्रे तयार होईल. केमिकल विकतचे स्प्रे आणण्यापेक्षा आपण घरगुती स्प्रे तयार करून झुरळ आणि पालींना पळवून लावू शकता.
स्प्रे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
एक ग्लास गरम पाणी.
फिनाईल.
फरशी स्वच्छ करणारं लिक्विड.
बेकिंग सोडा.
डेटॉल.
आधी फिनाइल टॅब्लेटची पावडर तयार करा. गरम पाण्यात फिनाइल पावडर मिसळा. नंतर त्यात एक झाकण फ्लोअर क्लीनर घाला. एक चमचा बेकिंग सोडा आणि डेटॉल घाला. सर्व साहित्य चमच्यानं मिसळा.
तयार पाणी स्प्रे बॉटेलमध्ये भरा. झोपण्यापूर्वी पाली आणि झुरळे ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी स्प्रे करा. स्वयंपाकघरातील कोपऱ्यात, सिंकखाली, कॅबिनेटच्यामागे स्प्रे फवारावा. रात्रभर तसेच राहूद्या. तीव्र वासामुळे झुरळं आणि पाली घरातून पळ काढतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.