E Challan Payment  Saam Tv
देश विदेश

E Challan Payment : गलती सें मिस्टेक! स्कुटीचालकाला चक्क सीट बेल्ट घातला नाही म्हणून पाठवला चालान, प्रकरण निघालं भलतंच!

E Challan Payment : तुम्ही स्कुटी चालवताय आणि तुम्हाला सीट बेल्ट लावला नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी दंड आकारला तर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

E Challan Fine : तुम्ही स्कुटी चालवताय आणि तुम्हाला सीट बेल्ट लावला नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी दंड आकारला तर? असं जर घडलं तर ४४० व्होल्टचा झटका बसेल ना! बिहारमध्ये असाच एक प्रकार घडला आहे.

सिग्नल (Signal) तोडून पळून जाणे, सीट बेल्ट न लावता कार चालवणे आदी वाहतूक नियम मोडले तर वाहतूक पोलीस लगेच ई-चालान पाठवतात. त्यामुळं वाहतूक पोलिसांच्या 'हातावर तुरी' देऊन पळणं आता ई चालानमुळं तरी शक्य नाही. (Viral News)

रिपोर्टनुसार, बिहारमध्ये (Bihar) एका स्कुटीचालकासोबत हा प्रकार घडला आहे. सीट बेल्ट लावला नाही म्हणून त्याला १ हजार रुपये दंड (Fine) जमा करावा, अशी नोटीस आली. आश्चर्य वाटलं ना...एका स्कुटीचालकाला सीट बेल्ट लावला नाही म्हणून चक्क नोटिस आली. पण हा प्रकार वेगळाच आहे.

बिहार येथील समस्तीपूर जिल्ह्यातील उदा पट्टी गावात हा प्रकार घडला आहे. कृष्ण कुमार याच्या मोबाइलवर एप्रिलमध्ये वाहतूक विभागाकडून (Traffic Police) एक मेसेज आला. सीट बेल्ट लावला नाही म्हणून १ हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे, असे त्या मेसेजमध्ये लिहिले होते. हा चालान ऑक्टोबर २०२० मध्ये पाठवण्यात आला होता.

कृष्ण कुमारच्या नावाने पाठवलेला चालान आणि त्यातील दंडाची रक्कम यापूर्वीच दुसऱ्या व्यक्तीने भरली होती. त्यामुळे ज्याच्या नावाने नोटिस आली, ती व्यक्ती स्कुटीचालक नव्हतीच असे समोर आले.

ई-चालान नेमकं काय असतं?

नवीन मोटार वाहन कायदा अस्तित्वात आल्यानंतर चालानची प्रक्रिया आणि त्यातील दंडाची रक्कम यामध्ये बदल झाला आहे. सिग्नल तोडण्यापासून ते प्रदूषण नियंत्रण कायद्यातील नियमांचे उल्लंघन याबाबतही वाहतूक विभाग तुम्हाला चालान पाठवू शकतो. तुम्ही सिग्नल नियम मोडला किंवा वेगमर्यादेचे उल्लंघन केले तर रस्त्यावर लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये तुमच्या वाहनांची नंबर प्लेट कैद होते. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने सूचित केले जाते. तुम्ही वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याने तुम्हाला दंड आकारण्यात येत आहे, असे त्यात नमूद केलेले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT