Cheapest E-Scooter : अरे वा! सायकलच्या किमतीत मिळतेय नवीन ई स्कूटर, रेंजही दमदार!

काही कंपनीनी ग्राहकांचा विचार करता ई-स्कूटर लॉन्च केल्या आहे ज्या पर्यावरण पूरक आहेत.
Cheapest E-Scooter
Cheapest E-ScooterSaam Tv
Published On

Cheapest E-Scooter : देशात वाढणाते पेट्रोल व डिझेलचे भाव वेळोवेळी कमी जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. वाहनांची क्रेझ असणाऱ्यांना या समस्येचे सामना करावा लागतो. त्यातच पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या या आपल्या ग्राहकांसाठी नवेनवे पर्याय शोधत असते.

त्यासाठी काही कंपनीनी ग्राहकांचा विचार करता ई-स्कूटर लॉन्च केल्या आहे ज्या पर्यावरण पूरक आहेत. ई-स्कूटर्सची उच्च किंमत अजूनही मोठ्या लोकसंख्येच्या आवाक्याबाहेर आहे. जर तुम्हालाही असेच वाटत असेल आणि तुम्हालाही ई-स्कूटर घ्यायची असेल, परंतु जास्त किंमतीमुळे ती घेता येत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सर्व काही सांगत आहोत.

Cheapest E-Scooter
Sports Bike : Pulsar आणि Apache ची क्रेझ होणार कमी ; 'या' बड्या कंपनीच्या तब्बल 9 बाइक्स होणार लॉन्च !

जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल आणि कमी बजेटमध्ये सर्वोत्तम पर्याय शोधत असाल, तर Avon e-Plus हा सर्वोत्तम पर्याय आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर केल्याने तुमच्या खिशालाही मोठा दिलासा मिळेल. देशाची राजधानी दिल्लीमध्ये Avon E-Plus ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 25,000 रुपये आहे. त्याच वेळी, त्याची ऑन-रोड किंमत 29,371 रुपये आहे. यावर जानेवारीची ऑफरही (Offer) सुरू आहे. त्याच वेळी, Avon e-Lite ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत (Price) फक्त 28,000 रुपये आहे.

1. 8 तासात पूर्ण चार्ज, रेंज 50km

  • Avon e-Plus च्या पॉवर आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर त्यात 232 W BLDC मोटर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • ही ई-स्कूटर एका चार्जवर 50 किमीपर्यंत जाऊ शकते. ही स्कूटर 4 ते 8 तासात फुल चार्ज होऊ शकते.

  • एव्हॉन ई-प्लस इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढील चाकामध्ये ड्रम ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

  • कमी अंतराची छोटी कामे करण्यासाठी ही ई-स्कूटर (E-scooter) मोठी मदत करू शकते.

  • एकीकडे, ही ई-स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमी पैसे खर्च करावे लागतील, तर दुसरीकडे, ती चालवताना तुमची मोठी बचत होईल.

Cheapest E-Scooter
Cheapest E-Scootercanva

2. चांगला पर्याय

  • Avon E-Plus व्यतिरिक्त, आणखी एक स्वस्त ई-स्कूटर i voomi S1 240 (IVOOMI S1 240) देखील बाजारात उपलब्ध आहे.

  • कंपनीने या स्कूटरमध्ये 4.2 Kwh ट्विन रिमूव्हेबल बॅटरी पॅक प्रदान केला आहे.

  • ही स्कूटर फुल चार्ज केल्यावर एका चार्जमध्ये २४० किमीपर्यंतचे अंतर कापू शकते.

  • या स्कूटरच्या बॅटरीवर कंपनी ३ वर्षांची गॅरंटी देते.

  • त्याची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 69,999 रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com