Himachal Pradesh Manali News Saam Tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! मुंबईतील तरुणीचा मनालीमध्ये मृत्यू, हादरवणारं कारण आलं समोर; नेमकं काय घडलं? वाचा

Himachal Pradesh Manali News : मनालीतील सोलांग व्हॅलीमध्ये अतिथंडीमुळे मुंबईच्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात तापमान शून्याखाली गेले असून थंडी, भूकंप आणि भूस्खलनाने निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे.

Alisha Khedekar

  • मनालीतील अतिथंडीमुळे मुंबईच्या तरुणीचा मृत्यू

  • सोलांग व्हॅलीत पर्यटनादरम्यान प्रकृती बिघडली

  • तापमान शून्याखाली गेल्याने थंडीचा कडाका

  • पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

एकीकडे महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उकाडा तापदायक ठरत आहे. तर दुसरीकडे निसर्गरम्य हिमाचलमध्ये सध्या निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. याठिकाणी किमान तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईतील एक तरुणी या थंडीचा बळी ठरली आहे. मनाली येथे पर्यटनासाठी गेलेल्या तरुणीचा अतिथंडीमुळे मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका विष्णू दुखंढे असे मृत मुलीचे नाव असून ती मुंबईतील काळाचौकी परिसरात रहिवाशी होती. प्रियंका ही आपल्या मावशीसोबत मनालीपासून १५ किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध सोलांग व्हॅलीमध्ये फिरायलागेली होती. मात्र तिथून परत येत असताना तिला अचानक थंडी भरली आणि हुडहुडी भरली.

तिची प्रकृती हळूहळू गंभीर होऊ लागली. म्हणून तिला तात्काळ मनालीतील एका रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 'कोल्ड एक्स्पोजर'मुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत असून मनालीतील तापमान शून्याखाली गेले आहे. शिवाय थंडीच नाही, तर इतर नैसर्गिक आपत्तींनीही इथे थैमान घातले आहे. गुरुवारी पहाटे ३.५९ वाजता किन्नौर जिल्ह्यात ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू चांगो परिसरात होता. कुल्लू जिल्ह्यातील पहनाला गावाजवळ गुरुवारी सकाळी भूस्खलन झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT