Petrol Diesel Price  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, पेट्रोल-डिझेल महागणार?

जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड 2.94 डॉलरने वाढून प्रति बॅरल 83.92 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, WTI 2.07 डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल 74.29 डॉलरवर विकले जात आहे. दररोज प्रमाणे आजही सरकारी तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत.

आज महाराष्ट्रात पेट्रोलचा दर 0.89 रुपयांनी वाढून 106.85 रुपये प्रति लिटर तर डिझेल 0.84 रुपयांनी महागून 93.33 रुपयांवर पोहोचला आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.60 रुपयांनी वाढून 103.58 रुपये आणि डिझेल 0.59 रुपयांनी वाढून 96.55 रुपये इतके झाले आहे. याशिवाय हरियाणामध्ये पेट्रोल 0.28 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 97.24 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, तर डिझेल 90.08 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. पंजाब, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्येही इंधन स्वस्त झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Crime : जालना हादरले; जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई- वडिलांनाही बेदम मारहाण

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नये?

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

SCROLL FOR NEXT