Solapur Kandalgaon Gram Panchayat Election : गावागावांतील राजकीय जनमताचा कौल मांडणाऱ्या राज्यातील साडेसात हजारांहून अधिक ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकांचे निकाल मंगळवारी (20 डिसेंबर) जाहीर झाले. गावपातळीवर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत अनेकांनी बाजी मारली. दरम्यान, निवडणुकीत घोडेबाजार झाला असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला. तर काही ठिकाणी मतमोजणी सुरू असताना दोन गटातील कार्यकर्ते आमने-सामने आले. (Breaking Marathi News)
सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) कंदलगावमध्ये मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये गरबड केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या पॅनलने केला आहे. EVM मशीन हॅक झाल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विरोधकांनी हा आरोप केला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पाच लाख रुपये घेऊन मतमोजणीच्या आधीच कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडणार याबाबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा दावा विरोधी पॅनलने केला आहे. याबाबत कंदलगाव च्या विरोधी पॅनलने जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारीचे निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ ही निवडणूक रद्द करावी आणि नव्याने निवडणूक घ्यावी अशी मागणी सुद्धा विरोधी पॅनलच्या वतीने करण्यात आली. जर ही निवडणूक प्रक्रिया रद्द न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढू, असा इशाराही विरोधी पॅनलच्या वतीने देण्यात आला आहे.
त्याचबरोबर संपूर्ण गावातील 1000 हून अधिक मतदार जिल्हाधिकाऱ्यांकडे एफिडेविट सादर करणार आहेत.ही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास हायकोर्टात याचिका दाखल करू असंही विरोधी पॅनलकडून सांगण्यात आलं आहे. ईव्हीएम मशीन हॅक केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.