Solapur News : सोलापुरात कोरोनाने रुग्णाचा मृत्यू; महापालिका प्रशासन अलर्ट

सोलापुरात उपचारासाठी आलेल्या जुना विडी घरकुल भागातील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
Corona Virus
Corona VirusSaam Tv
Published On

Solapur News : सोलापुरात उपचारासाठी आलेल्या जुना विडी घरकुल भागातील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या मृत्यूमुळे महापालिकेचे आरोग्य प्रशासन अलर्ट झाले आहे. त्या मृत व्यक्तीच्या संपर्कातील नातेवाईकांची तपासणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. (Latest Marathi News)

Corona Virus
Covid-19 Alert : जगात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला; मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क, दिले 'हे' निर्देश

कोरोनाने मृत पावलेली व्यक्ती ही 61 वर्षांची असून मागील चार ते पाच दिवसांपासून कर्नाटकातील विजयपूर येथून सोलापुरात (Solapur) आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. त्या रुग्णाला टीबी तसेच दम्याचा त्रास असल्याचा देखील महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. 19 डिसेंबर रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 20 डिसेंबर रोजी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे.

Corona Virus
COVID-19 Norms : पर्यटकांनो सावधान! लोणावळ्यात नवीन वर्षाचे स्वागत करायला येत असाल, तर ही बातमी वाचाच

दरम्यान, महापालिका प्रशासनाने संबंधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचं सांगितलंय. मृत रुग्ण हा विजापूरहुन आलेला असल्याने तो सोलापूरमध्ये कोणाच्याही संपर्कात आला नसल्याचे सोलापूर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व राज्यांना अॅलर्ट; सरकारनं उचललं मोठं पाऊल

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाच, भारतानं सावध पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना अॅलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

टेस्ट-ट्रॅक-ट्रीड आणि लसीकरण यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, असेही त्यांनी सांगितले. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आणि आगामी उत्सव काळात मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन होईल हे सुनिश्चित करावे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com