Encouter In Dantewada ANI
देश विदेश

Encouter In Dantewada: दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार; शस्त्रे, दारूगोळा जप्त

Chhattisgarh News: दंतेवाडा-सुकमा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झालेत.

Bharat Jadhav

Encouter Security force And Naxalites In Dantewada:

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्याच्या दंतेवाडा-सुकमा सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झालेत. बस्तर सैनिक आणि जिल्हा राखीव गट (डीआरजी) नक्षलविरोधात कारवाई करत आहे. (Latest News)

दंतेवाडा-सुकमा सीमेजवळील तुमकपाल आणि डब्बा कुन्ना गावांदरम्यान नक्षलवादी कारवाई केली जात होती. नक्षलवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून तपास करण्यात आला त्याचदरम्यान दोन्ही बाजुंनी गोळीबार झाला. या कारवाईची माहिती तुमकपाल येथील पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी दिली. सुरक्षा दल तपास कार्य करत असताना नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. ही चकमक सुमारे संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास चकमक झाली. ज्यामध्ये दरभा विभागातील तीन नक्षलवादी ठार झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच शस्त्रे आणि दारुगोळादेखील जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिलीय. आम्हाला दंतेवाडा-सुकमा सीमे भागात असलेल्या तुमकपाल आणि डब्बा कुन्ना गावात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली, त्यादरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार केला त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं, यात ३ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक राय यांनी दिली. दरम्यान मृत नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अधिकाऱ्याने या तिघांची ओळख पटवणे बाकी आहे. लगतच्या ठिकाणी शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूज मध्ये फेर मतदान घेण्याची मागणी

Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

SCROLL FOR NEXT