Corona Update SaamTV
देश विदेश

IIT मद्रासमध्ये फुटला 'कोरोना बॉम्ब'; पॉझिटिव्ह रुग्ण शंभरीपार

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

चेन्नई: महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि इतर राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या (corona patients) झपाट्यानं वाढत आहे. आता IIT मद्रासमध्ये (IIT Madras) कोरोनानं शिरकाव केला आहे. ३२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण (corona new patients) आढळले आहेत. त्यामुळं कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १११ झाली आहे. तामिळनाडूच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली.

राज्याचे आरोग्य सचिव डॉ. जे. राधाकृष्णन आणि चेन्नई विभागीय अधिकारी डॉ. अॅल्बी यांनी संस्थेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. यावेळी राधाकृष्णन यांनी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत काळजी घेण्याचा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचा सल्ला दिला. राज्यात चौथी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. कोविड १९ नियमांचं पालन होत आहे की नाही, हे सुनिश्चित करावे, असे निर्देश त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. सरकारी यंत्रणांना कोणत्याही परिस्थितीत सज्ज राहायला हवं, असं स्टॅलिन यांनी सांगितलं होतं.

तत्पूर्वी, आयआयटी मद्रासकडून या आठवड्यात एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं होतं. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार, डॉक्टरही सतर्क आहेत. विद्यार्थी स्वयंसेवक नेमण्यात आले असून, कोविड १९ नियम लागू करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे. सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. संस्थेने याआधी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही यशस्वीरित्या सामना केला होता, असेही संस्थेने सांगितलं.

देशात 'अशी' आहे स्थिती

रिपोर्टनुसार, केंद्रीय आरोग्य विभागाने मंगळवारी सकाळी नवीन कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २४८३ नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात एकूण करोना रुग्णांची संख्या ४३, ०६२,५६९ झाली आहे. याच कालावधीत १९७० रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

Monday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ५ राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT