MI मध्ये सचिन-जहीरसह दिग्गज मंडळी; पराभवाचा ठपका एकट्या रोहितवरच का ?

मुंबई इंडियन्सची पराभवाची नेमकी कारणं काय ?
IPL 2022 Rohit Sharma
IPL 2022 Rohit SharmaSaam TV
Published On

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL) पाचवेळा अजिंक्यपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यंदाच्या हंगामात मात्र आठ सामन्यांमध्ये पराभवाचाच सामना करावा लागलाय. सलग आठवेळा प्रतिस्पर्धी संघासोबत पराभव झालेल्या मुंबई इंडियन्सचं आयपीएलच्या पंधराव्या मोसमातील विजेतेपदाचं आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचं चित्र आहे. मुंबई संघाची होत असलेली खराब कामगिरीवर सोशल मीडियावरही ट्रोलिंग सुरु झालीय. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी मुंबई संघाच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लखनौच्या पराभवानंतर फलंदाजांच्या कामगिरीचे पोस्टमार्टेम केले जाणार असल्याचेही माहेला म्हणाले आहेत. दरम्यान, मुंबई संघाचा सतत होत असलेल्या पराभवाचं खापर कर्णधार रोहित शर्मावर फोडलं जात आहे. मुंबईच्या संघात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि जहिर खान (Zaheer Khan) यांच्यासह १८ सपोर्टिंग स्टाफ आहेत. पण रोहित शर्मावरच खराब नेतृत्व आणि फलंदाजीचे आरोप होत आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघात दिग्गज अनुभवी खेळाडुंचा सपोर्ट असतानाही रोहित शर्मावरच (Rohit Sharma) संघाच्या खराब कामगिरीचा ठपका का ठेवला जात आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

IPL 2022 Rohit Sharma
IPL 2022 Point Table: 'हा' एकच मार्ग चेन्नईला पोहोचवणार 'प्लेऑफ'मध्ये

मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये पाचवेळा अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्मावर यंदाच्या मोसमात खराब कामगिरीमुळं टीका होत आहे. परंतु, मुंबईच्या संघात लिडरशीप ग्रुपमध्ये फक्त रोहित शर्माच नाही तर इतरही दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे फक्त रोहित शर्मावरच पराभवाचं खापर फोडणं कितपत योग्य आहे ? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. मुंबईच्या संघात दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, माहेला जयवर्धने, जहीर खानसारखे खेळाडू सपोर्ट स्टाफमध्ये आहेत. त्यामुळे आता आगमी होणाऱ्या सामन्यांमध्ये तरी मुंबई विजयाचं खातं उघडतं का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्सची पराभवाची कारणे

१) मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं बॅलेंन्स बिघडलं. त्यामुळे नवीन कोर ग्रुप बनवण्याचं आव्हान आहे.

२) ऑक्शनमध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला ८ कोटींची बोली लावून विकत घेतलं. परंतु, जोफ्रा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत नाहीय.

३) इशान किशनला १५.१५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. पण सुरुवातीच्या दोन सामन्यांतील अर्धशतक वगळता इतर सामन्यांमध्ये चमकदार फलंदाजी करता आली नाही.

४) कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म

५) गोलंदाजीत जसप्रीत बुमराहसारखा दुसरा चांगला गोलंदाज नाही. त्यामुळे विकेट्स घेण्यात आणि धावा रोखण्याता इतर गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com