IPL 2022 Point Table
IPL 2022 Point TableSaam TV

IPL 2022 Point Table: 'हा' एकच मार्ग चेन्नईला पोहोचवणार 'प्लेऑफ'मध्ये

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने या लीगमधील पहिल्या 8 सामन्यांपैकी 6 गमावले आहेत आणि फक्त 2 सामने जिंकले आहेत.
Published on

आयपीएलच्या १५ व्या (IPL 2022) मोसमातील गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जची (CSK) अवस्था खूपच निराशाजनक आहे. सीएसकेने या मोसमात 8 पैकी 6 सामने गमावले आहेत. आयपीएल 2022 च्या 38 व्या सामन्यात चेन्नईचा पंजाब किंग्जकडून (CSK vs PBKS) 11 धावांनी पराभव झाला. यासोबतच, पाच वेळचा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 15 व्या हंगामात सलग 8 पराभवांसह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता प्रश्न असा आहे की चेन्नईची अवस्थाही मुंबईसारखी झाली आहे?.

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने या लीगमधील पहिल्या 8 सामन्यांपैकी 6 गमावले आहेत आणि फक्त 2 सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्जला आता आयपीएल 2022 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे. सीएसकेला पंजाब किंग्जविरुद्ध 11 धावांनी पराभव पत्करावा लागला, परंतु सीएसकेचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग अद्याप संपलेला नाही.

IPL 2022 Point Table
Sakshi Dhoni: झारखंडमध्ये वीज संकट, साक्षी धोनीने सरकारला घेरले, म्हणाली...

CSK ला अजूनही या मोसमात प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. चेन्नई सुपर किंग्जचे अजून 6 सामने बाकी आहेत, संघाला हे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. सामना जिंकण्यासोबतच चेन्नईला नेट रनरेटवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सध्या, CSK चा नेट रन रेट -0.538 आहे. 6 पराभवांसह CSK गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. सीएसकेने उर्वरित सर्व सामने जिंकल्यास रन रेट चांगले असेल तर प्लेऑफमध्ये जाऊ शकतात.

IPL 2022 मध्ये CSK आणि PBKS दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. यापूर्वी 3 एप्रिल रोजी पंजाब आणि CSK यांच्यातील सामन्यात पंजाबने CSK चा 54 धावांनी पराभव केला होता. पंजाब किंग्जने दुसऱ्यांदा सीएसकेवर 11 धावांनी मात केली. सीएसकेने या मोसमात दोनदा विजय मिळवला आहे. पहिल्यांदा CSK ने RCB ला हरवले आणि दुसऱ्यांदा CSK ने मुंबई इंडियन्सला हरवले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com