नवऱ्याने दुसरा जन्म घेतला म्हणत; महिलेनं गाईसोबत केलं लग्न Saam Tv
देश विदेश

नवऱ्याने दुसरा जन्म घेतला म्हणत; महिलेनं गाईसोबत केलं लग्न

एका महिलेने चक्क गाईबरोबरच लग्न केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : एका महिलेने चक्क गाईबरोबरच लग्न केले आहे. या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. महिलेच्या लग्न करण्याच्या निर्णयामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. मात्र, या महिलेने असे का केले? यापाठीमागचे कारणे देखील मजेशीर आहे. या महिलेने आपल्या मुलांनाही गायीची चांगली सेवा करण्यास सांगितले आहे.

कंबोडियाच्या (Cambodia) क्राती प्रांतात राहणारा खिम हांग (74) अचानक चर्चत आले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचे गाईबरोबर लग्नच केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार खिम हांग या महिलेने गाईबरोबरच लग्न केल्याचा कोणताही व्हिडिओ नाही. मात्र, गावातील अनेक लोकांचा दावा आहे की, त्यांनी हे लग्न बघितले आहे आणि त्यांनी त्यात हजेरी देखील लावली आहे.

हे देखील पहा-

महिलेने गाईसोबत का लग्न केले? दरम्यान, खिम हांग या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. यानंतर खिम हांग यांनी एका गायीशी लग्न केले आहे. कारण तिचे असे सांगणे आहे की, तिच्या मृत पतीने गायीच्या रूपात दुसरा जन्म घेतला आहे. खिम हांग यांना तिच्या मृत पतीचे सर्व गुण या गायीमध्ये बघतात. आता ही गाय खिम हांग यांच्या कुटुंबामधील सर्वात महत्त्वाची सदस्य बनली आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब त्याची सेवा करत आहे.

पतीसारखे माझ्यावर प्रेम करते' खिम हांग याचे सांगणे आहे. गायीचा जन्म झाला, तेव्हा तिने तिच्याबरोबर बराच वेळ घालवला आहे. या दरम्यान गाय माझे हात आणि चेहरा चाटत असे आणि अनेक वेळा ती माझे चुंबन देखील घेत असे. पती जसे माझ्यावर प्रेम करत होते, तसेच गाय माझ्यावर प्रेम करत आहे. त्यामुळे मला वाटले की गायीच्या रूपात माझा नवरा परत आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'सोबत भयंकर घडलं, ५ लाखांच्या कारसाठी सासरच्यांकडून छळ

Rakul Preet Singh: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला झटका, आयकर विभागाकडून घरासह १२ ठिकाणी छापेमारी, नेमकं प्रकरण काय?

संपूर्ण गावच विक्रीला काढलं! ग्रामस्थांचा टोकाचा निर्णय

Homemade Honey Recipe : बाजारातलं महागडं मध खरेदी करणं सोडा, घरच्या घरी फक्त ३ पदार्थांपासून 'असे' बनवा शुद्ध मध!

Maharashtra News Live Update: उज्जैनमध्ये शाही मस्जिदचा वाद पेटला पोलिसांकडून लाठी चार्ज

SCROLL FOR NEXT