Thalapathy Vijay faces a crucial test as TVK falls short of majority while political reactions intensify. saam tv
देश विदेश

थलपती विजय नव्हे तर भाजप सरकार स्थापन करणार, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Thalapathy Vijay TVK Majority Number Tamil Nadu: तमिळनाडू निवडणुकीत थलपती विजय यांच्या TVK पक्षाला बहुमतासाठी अजून जागांची गरज असताना, पप्पू यादव यांनी भाजपवर टीका करत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Omkar Sonawane

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण चांगलच तापल आहे. अभिनेता विजय थलापती यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणू झेप घेतली आहे. मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेला 118 चा आकडा गाठण्यासाठी विजय यांना अजून 10 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे खासदार पप्पू यादव यांनी भाजपवर निशाणा साधत एक उपरोधिक फॉर्म्युला मांडला आहे.

पप्पू यादव यांचा ईडी-सीबीआयला टोला

शुक्रवारी खासदार पप्पू यादव यांनी ट्विटर् वरून राज्यपालांच्या भूमिकेवर आणि भाजपवर तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तमिळनाडूच्या राज्यपालांनी भाजपच्या एकमेव आमदाराला सरकार बनवण्यासाठी निमंत्रित करायला हवे! कारण त्यांना बहुमत सिद्ध करणे सर्वात सोपे आहे. राज्यपाल, ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि निवडणूक आयोग मेहनत घेऊन त्यांच्यासाठी बहुमताचा आकडा सहज गोळा करतील.

सत्तेचे गणित; कुणाकडे आहे चावी?

विजय थलापतींच्या TVK पक्षाचे भवितव्य आता CPI, CPM आणि VCK या पक्षांच्या निर्णयावर अवलंबून आहे. TVK ने या तिन्ही पक्षांकडे पाठिंबा मागितला असून, आज (शुक्रवार) संध्याकाळपर्यंत हे पक्ष आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. हे तिन्ही पक्ष दीर्घकाळापासून DMK आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे जनमताचा आदर करून विजय यांना साथ द्यायची की DMK सोबतची मैत्री टिकवायची, असा पेच त्यांच्यासमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: महामार्गावर रक्तरंजित थरार! शेतीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, तरुणाकडून मावस भावावर कोयत्याने सपासप वार

सिद्धरामय्यांचा राजीनामा; कर्नाटकातील नेतृत्वबदलाची इनसाईड स्टोरी काय? VIDEO

8th Pay Commission: गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, वाढीव पगार आणि एरियर कधीपर्यंत मिळणार?

Friday Horoscope : संकटाचा सामना करावा लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार

सर्वात मोठा पक्षप्रवेश! 25,000 कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंचा 'मविआला' हादरा

SCROLL FOR NEXT