Jammu Kashmir  Saamtv
देश विदेश

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

Jammu Kashmir Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Priya More
  • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

  • अनंतनागच्या लाल चौक परिसरातील घटना

  • पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला

  • या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल आशिक हुसैन शहीद झाले

  • हल्ल्यात एक जवान गंभीर जखमी झाला

जम्मू-काश्मीरचा आनंतनाग परिसर दहशतवादी हल्ल्याने हादरले. अनंतनागच्या कस्बा परिसरातील लाल चौकाजवळ पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये एक पोलिस शहीद झाला. तर आणखी एक पोलिस गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिस आणि जवानांनी संपूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. ही घटना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. सध्या पोलिस आणि जवानांकडून या हल्ल्याचा तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दक्षिम काश्मीरच्या अनंतनाग येथील लाल चौक परिसरात दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. दहशतवाद्यांनी जवानाच्या पथकावर गोळीबार केला. अमरनाथ यात्रेनिमित्त पोलिसांचे पथक अनंतनाग लाल चौक परिसरातील रस्त्यावर कर्तव्य बजावत होते. अचानक त्याठिकाणी एका वाहनातून दहशतवादी आले. त्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये दोन पोलिस गंभीर जखमी झाले. या मधील एका पोलिसाचा मृत्यू झाल. तर गंभीर जखणी एका पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहीद झालेल्या पोलिसाचे नाव आशिक हुसैन असल्याची माहिती समोर आली. ते जम्मू-काश्मीर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

या घटनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला ज्यात जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष दलात तैनात असलेले दोन जवान जखमी झाले. हेड कॉन्स्टेबल आशिक हुसैन आणि आणखी एका जवानाला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आशिक हुसैन वाचवता आले नाही. गोळीबारात जखमी झालेल्या दुसऱ्या जवानावर उपचार सुरू आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी पुढे असेही सांगितले की, परिसरात सुरक्षा कर्मचारी कर्तव्यावर असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. गोळीबारानंतर लगेचच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि हल्लेखोरांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी घटनास्थळी अतिरिक्त पोलिसांचा ताफा पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: किडनी निकामी झाल्यास त्वचेवर दिसतात हे ६ गंभीर बदल, वेळीच व्हा सावध

राज्यात 21 दिवसांत 50 भूकंप; दोनच जिल्ह्यांमध्ये का होतोय वारंवार भूकंप?

महामार्गावर ४ वाहनांचा विचित्र अपघात; तरूण उद्योजकासह दोघांनी जीव गमावला, १८ सेकंदाचा VIDEO बघून थरकाप उडेल!

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत? अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा, जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार?

Pune Municipal Corporation: पुणेकरांचे 254 कोटी खड्ड्यात; महापालिका-कंत्राटरांच्या अभद्र युतीतून लूट?

SCROLL FOR NEXT