Pakistan Terrorist:  Saam tv
देश विदेश

Terrorist: हिटलिस्टवर 14 दहशतवादी, 2 दिवसांत 6 जणांचा खात्मा; आता 'टेरर ऑल आऊट'

Pakistan Terrorist: भारताच्या हिटलिस्टवर १४ दहशतवादी आहेत. २ दिवसांत यामधील ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर उर्वरीत ८ जणांचा शोध घेतला जात आहे.

Priya More

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

भारतानं दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या आकांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरनंतर 'ऑपरेशन केलर' सुरु केलंय. लष्करानं हिटलिस्टवरील 14 दहशतवाद्यांच्या नावांची घोषणा केलीय. त्यामुळे 'टेरर ऑल आऊट' कसं सुरु आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानमधील दहशतवादाचा कणाच मोडलाय. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांचा खात्मा करतेय. भारतीय लष्करानं दहशतवाद्यांची हिटलिस्ट जारी केलीय. त्यातील सहा दहशतवाद्यांना अवघ्या दोन दिवसात कंठस्नान घालण्यात आलयं. तर इतर 8 दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. आर्मीच्या हिटलिस्टवर 14 दहशतवादी आहेत. भारतीय लष्कराच्या कारवाईत तोयबाचा एहसान अहमद शेख ठार झाला.

जैश-ए- मोहम्मदचा आसिफ अहमद शेख, आमिर नजीर वानी, यावर अहमद भटचा खात्मा करण्यात आला. लष्कर आणि TRF चा शाहिद कुटे आणि अदनान शफी डारचा खात्मा करण्यात आला. लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी नसीर अहमद वानी, हारिस नजीर, आदिल डेंटो, आमिर डार, जाकीर गनी मात्र अद्याप सक्रीय आहेत. आसिफ खांडे, जुबैर अहमद वानी, हारून रशीद गनी हे हिजबुल मुजाहिदीनचे दहशतवादी अजून सक्रीय आहेत. आठही दहशतवादी भारतविरोधी कारवायात सक्रीय आहेत.

लष्करानं 14 दहशतवाद्यांची हिटलिस्ट जारी केल्यामुळे आता दहशतवादी पाकच्या आश्रयाला जाऊन लपलेत. मात्र हिटलिस्टवरील उर्वरित 8 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय भारतीय लष्कर शांत बसणार नाही. पुन्हा कुणीही दहशतवादी भारताकडं वाकड्या नजरेनं पाहणार नाही अशी जरब या मोहीमेमुळे बसेल एवढं निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT