Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं
Beed Crime Saam Tv

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

Beed Police: बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी रात्री ९ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी हत्या झालेल्या तरुणाच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.
Published on

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली आहे. पत्रकाराच्या मुलाची भरचौकात धारदार शस्त्राने सपासप वार करत हत्या करण्यात आली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाने जागीच प्राण सोडले. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. यश ढाके असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या हत्येने बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. वर्दळ असलेल्या ठिकाणी रात्री ९ वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने पोटावर सपासप वार करत या तरुणाची हत्या करण्यात आली. हत्येमागील कारण समोर आले आहे. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली.

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं
Pune Crime : शिकवणीसाठी घरी येणाऱ्या मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे सश्रम कारावास

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत यशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करत आहे. यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा होता. यश २२ वर्षांचा होता आणि तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं
Nashik Crime: १२ तास, २ खून, नाशिक हादरले; नागरिक दहशतीखाली, गुंडांचं पोलिसांनाच थेट आव्हान

यश ढाकाची हत्या त्याचाच मित्र सूरज काटेने केली. महिनाभरापूर्वी सूरज आणि यश यांच्यामध्ये वाढदिवस साजरा करताना वाद झाला होता. या वादातूनच सूरजने यशची हत्या केली. सूरजने यशवर धारदार शस्त्राने वार केले. यशच्या छातीवर करण्यात आलेले दोन वार शरीरात आरपार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे यशने जागीच प्राण सोडले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं
Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com