Pune Crime : शिकवणीसाठी घरी येणाऱ्या मुलीवर अत्याचार; नराधमास २० वर्षे सश्रम कारावास

Pune News : कोर्टामध्ये मागील चार वर्षांपासून सुनावणी सुरु होती. तर दुसरीकडे पीडित मुलगी हि न्यायाच्या प्रतीक्षेत होती. यावर अंतिम सुनावणी झाली असता कोर्टाने सदर प्रकरणाचा महत्वपूर्ण निर्णय
Pune Crime
Pune CrimeSaam tv
Published On

सचिन जाधव 

पुणे : शिकवणीसाठी घरी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात चार वर्षांपूर्वी घडली होती. मुलीवर धमकावत अत्याचार करणाऱ्या या नराधमास न्यायालयाने २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ३७ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

पुणे शहरात हा प्रकार ३ ऑगस्ट २०२१ ते २९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत घडला होता. संजय रमेश शर्मा (वय ५६) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आरोपी संजय शर्मा याच्या घरी शिकवणीसाठी जात होती. त्यावेळी आरोपी हा मुलीला आणि तिच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करत होता. साधारण तीन महिने अत्याचार करत राहिला. 

Pune Crime
Shahapur : ८० लाखाचा बारदान घोटाळा; दोषी मोकाट असल्याचा आरोप, लेखापालांच्या चौकशी समितीवरच प्रश्नचिन्ह

चार वर्षांपासून सुरु होती सुनावणी 

दरम्यान घडल्या प्रकरणी माहिती मुलीने घरी सांगितली. यानंतर मुलीच्या आईने वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करत संजय शर्मा यास ताब्यात घेतले होते. यानंतर कोर्टामध्ये मागील चार वर्षांपासून सुनावणी सुरु होती. तर दुसरीकडे पीडित मुलगी हि न्यायाच्या प्रतीक्षेत होती. यावर अंतिम सुनावणी झाली असता कोर्टाने सदर प्रकरणाचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 

Pune Crime
Jayant Patil : पूरग्रस्तांना दसऱ्यापूर्वी २५ हजार रूपयांची तातडीची मदत द्यावी; जयंत पाटील यांची मागणी

पीडितेला अखेर मिळाला न्याय 
सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले. तर कोर्टात सुनावणी सुरु असताना या खटल्यात सबळ पुरावे आणि साक्षीदार मांडण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपीस बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये शिक्षा सुनावली. यामध्ये २० वर्षांचा सश्रम कारावास व दंड ठोठावण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com