Dhanshri Shintre
Amazon आणि Flipkart वर सणासुदीची सेल सुरू झाली आहे, जिथे ग्राहकांना विविध स्मार्टफोन्स आकर्षक ऑफर्स आणि परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.
२३ सप्टेंबरपासून Amazon आणि Flipkart वर सुरू झालेल्या सेलमध्ये Redmi, iQOO, Samsung, Realme सहित अनेक ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर आकर्षक सवलती मिळत आहेत.
जर तुम्ही कमी बजेटमध्ये एंट्री-लेव्हल ५जी स्मार्टफोन शोधत असाल, तर सुरू असलेल्या सेलमध्ये आकर्षक डील्ससह खरेदीची उत्तम संधी मिळू शकते.
१० हजारांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही काही उत्तम पर्यायांची यादी आणली आहे, ज्यावर आकर्षक ऑफर्स आणि सवलती उपलब्ध आहेत.
Flipkart सेलमध्ये Realme P3x 5G केवळ ₹10,999 मध्ये उपलब्ध असून बँक ऑफर्सनंतर किंमत आणखी कमी होईल, त्यामुळे हा बजेटसाठी उत्तम पर्याय ठरतो.
Oppo K13x 5G फ्लिपकार्ट सेलमध्ये १०,०००-११,००० रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल, ज्यामध्ये ग्राहकांना दमदार फीचर्ससह आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.
कमी बजेटमध्ये वेगळा पर्याय हवा असल्यास Alcatel V3 Pro उत्तम ठरू शकतो. सवलतीनंतर हा फोन ₹१०,००० च्या आत असून ४-इन-१ डिस्प्ले देतो.
Amazon वर iQOO Z10 Lite 5G आकर्षक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. मोठी बॅटरी असलेला हा फोन ₹१०,००० पेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.
सॅमसंग फोन हवे असल्यास Galaxy M06 5G हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सेल दरम्यान हा स्मार्टफोन ₹१०,००० पेक्षा कमी किमतीत उपलब्ध राहणार आहे.