Dhanshri Shintre
बीएसएनएलने ग्राहकांसाठी धक्का देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीने परवडणारा प्लॅन बंद केला असून, या निर्णयामुळे अनेक युजर्स नाराज झाले आहेत.
जिओने नुकतेच १०० रुपयांच्या डेटा अॅड-ऑनमधील फायदे कमी केले होते, तर आता बीएसएनएलने त्यांचा लोकप्रिय आणि परवडणारा प्लॅन रद्द केला आहे.
बीएसएनएलच्या १५१५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा दिला जातो. FUP संपल्यानंतरही वापरकर्त्यांना ४० केबीपीएस वेगाने अमर्यादित डेटा उपलब्ध होतो.
बीएसएनएलचा हा प्लॅन एका वर्षासाठी वैध होता. मात्र, कंपनीच्या पोर्टफोलिओमधून आता सर्व दीर्घकालीन डेटा-ओन्ली प्लॅन काढून टाकले गेले आहेत.
सध्या बीएसएनएलकडून सर्वात जास्त वैधता असलेला डेटा-ओन्ली पॅक ४११ रुपयांचा आहे. यात १०० जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो आणि वैधता ६० दिवसांची आहे.
बीएसएनएलकडे १९८ रुपयांचा एक किफायतशीर प्लॅनही आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना ३० दिवसांच्या कालावधीत ४० जीबी डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते.
बीएसएनएलकडून अल्पकालीन योजना देखील उपलब्ध आहेत. यात १०५ रुपये, ५८ रुपये आणि १६ रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे.
अलीकडील महिन्यांत बीएसएनएलने अनेक प्रीपेड प्लॅन्समध्ये बदल केले आहेत. १०७ रुपयांच्या प्लॅनची वैधता कमी करून ३५ दिवसांऐवजी २८ दिवसांची करण्यात आली आहे.
बीएसएनएलने ४८५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८२ दिवसांची वैधता कमी करून ७२ दिवसांची केली आहे, परंतु आता दररोज डेटा १.५ जीबीऐवजी २ जीबी झाला आहे.