Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Beed News : शेतकऱ्याच्या हातात शून्य उत्पादन आहे. अर्थात शेतात केलेला खर्च देखील आता निघणार नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. असेच चित्र आहेर चिंचोली शिवारात पाहण्यास मिळत आहे
Beed News
Beed NewsSaam tv
Published On

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे होत्याचं नव्हतं झालं आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. अशाच प्रकारे आहेर चिंचोली येथील शेतकऱ्याच्या शेतातील कपाशी पिकाची राख रांगोळी झाल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. पुराच्या पाण्यात शेत गेलं, घर गेलं; करायचं काय? बहीणच लग्न कसं करायचं; असं म्हणत शेतकऱ्याने हंबरडा फोडला.  

बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामासाठी लागवड करण्यात आलेल्या सर्व पिके यात उध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या हातात शून्य उत्पादन आहे. अर्थात शेतात केलेला खर्च देखील आता निघणार नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. असेच चित्र आहेर चिंचोली शिवारात पाहण्यास मिळत आहे. 

Beed News
Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

सांगा आम्ही कसं जगायचं  

बीडच्या आहेर चिंचोली येथील विदारक चित्र सिंधफना नदीचे पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कपाशी पिकाची राख रांगोळी झाली असून आता बहिणीचे लग्न कशाने करायचं; असं म्हणत शेतकऱ्याने हंबरडा फोडला. अजित दादा तुम्ही भेटून गेलात, पण मदत कधी मिळणार? आमचा सर्व संसार उघड्यावर पडला. वर्षभर आम्ही कशावर जगायचं शेतकऱ्यांपुढे मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. कपाशी पिकात पाणी घुसल्याने कपाशी पीक भुईसपाट झाले असून संसाराची राखरांगोळी झाली आहे. 

Beed News
Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली 

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेल्या आठ दिवसापासून पुराचे पाणी जैसे थे आहे. या भागातील आसेगाव, रुंज, गुंज भागात शेकडो हेक्टर शेती आसना नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेली होती. यामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग ही पिके आधीच नष्ट झाली आहे. आता या पुराच्या पाण्याचा फटका भागातील पीक असलेल्या उसाच्या शेतीला देखील बसला असून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com