Madhya Pradesh News Saam Tv
देश विदेश

Shocking: इंदुरमध्ये सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न, २८ तृतीयपंथीयांनी प्यायले फिनाइल; नेमकं कारण काय?

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. २८ जणांनी एकत्रित फिनाइल प्यायले. या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Priya More

मध्य प्रदेशच्या इंदुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी २८ तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्वांनी फिनाइल प्यायले. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एमवाय रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांनी फिनाइल पितानाचा व्हिडीओ देखील बनला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे संपूर्ण प्रकरण एका तृतीयपंथीयावर झालेल्या कथित बलात्कार आणि खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंदुरच्या पंढरीनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदलालपुरा भागात घडली. याठिकाणी राहणाऱ्या २८ तृतीयपंथियांनी एका खोलीमध्ये दरवाजा बंद करून फिनाइल प्यायले. याचा व्हिडीओ तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला आणि सर्व तृतीपंथी यांना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

तृतीयपंथीयांमधील वादानंतर एका गटामधील सर्वांनी एकत्रितपणे फिनाइल प्यायले. नंदलालपुरा येथे दोन तृतीयपंथीयांच्या गटांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. येथे एक गट सपना गुरुचा आहे तर दुसरा गट सीमा आणि पायल गुरुचा आहे. दोघांमध्ये अनेकदा वाद होतात. मंगळवारी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी देखील इंदूरला आले आणि त्यांनी या वादाबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांमधील या वादाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु तपास पूर्ण होऊ शकला नाही.

बुधवारी रात्री तृतीयपंथीचा एका गटाने रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एका खोलीत जाऊन दरवाजा बंद करून एकत्रित फिनाइल प्यायले. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला आणि सर्वांना रुग्णलायत दाखल केले. या घटनेनंतर तृतीयपंथीच्या एका गटाने रस्त्यावर चक्काजाम आंदोलन देखील करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी सर्वांची समजूत काढत त्यांना बाजूला हटवले आणि वाहतूक सुरळित केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर आज तोडगा निघणार?

Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

Nagpur : हिवाळ्यात नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार, विरोधक सरकारला घेरणार, कोणते मुद्दे गाजणार?

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT