५ मुलांची आई, १२ वर्षांपेक्षा लहान व्यक्तीच्या प्रेमात पडली अन् सुखी संसाराची राखरांगोळी झाली. बायकोनं बायफ्रेंडसोबत मिळून नवऱ्याचा काटा काढला. प्रेमात आंधळी झालेल्या पत्नीने आपल्याच कपाळाचे कंकू पुसले अन् सर्व बनाव रचला. पण उत्तर प्रदेश पोलिसांनी खुनी महिलेचा डाव उधळला. मुरादाबाद जिल्ह्यात अल्हाददपूर देवा नागला गावात घडली. पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हत्या झालेल्या आरोपीचे नाव वीरपाल असे आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी वीरपाल याच्या हत्येचा उलगडा केला. वीरपाल याची बायको आणि तिचा प्रियकर अंशु यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले की, "पाच मुलांची आई असलेल्या सुनीताने तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या प्रियकरासोबत तिच्या नवऱ्याला मारण्याचा कट रचला होता." या धक्कादायक घटनेनंतर मुरादाबदमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
नेमकं झालं काय?
चार महिन्यांपूर्वी शेती करताना सुनीता आणि अंशू यांची भेट झाली होती. यादरम्यान त्यांच्यात एकमेकांशी बोलणं वाढलं आणि त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. प्रियकराला भेटण्यासाठी सुनीता नवऱ्याला दारू द्यायची अन् शेतात पाठवायची. वारंवार हे घडत असल्यामुळे वीरपाल याला संशय आला अन् सुनीताचं बिंग फुटलं. एक दिवस वीरपाल अचानक घरी आला आणि त्याने बायको अन् प्रियकाराला नको त्या अवस्थेत पकडले. रागाच्या भरात वीरपालने आपल्या बायकोला मारहाण केली.
कट कसा शिजला?
नवऱ्याला लफडं समजल्यानंतर सुनीताला राग अनावर आला. तिने प्रियकरासोबत नवऱ्याला मारण्याचा प्लान आखला. त्यासाठी प्रियकराला गळ घातली. वीरपालचा काटा काढला नाही तर आत्महत्या करेन अशी धमकी दिली. त्यानंतर, १३ ऑक्टोबरच्या रात्री त्या दोघांनी एक भयंकर कट रचला. त्या रात्री वीरपाल शेतात झोपायला गेला. सुनीताने प्रियकराला शेतात बोलावले आणि गळा दाबायला सांगितले. प्रियकराने कोणताही विचार न करता वीरपालचा जीव घेतला.
आरोपीच्या पोलिासांनी मुसक्या आवळल्या
दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना वीरपालचा मृतदेह सापडल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले. तपासात पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि साक्षीदारांचे वक्तव्ये तपासली. त्यातून सुनीता आणि अंशू यांच्यात नेहमी संवाद होत असल्याचे समोर आले. पुराव्यांच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी आपापले गुन्हे कबूल केले. अंशूने कबूल केले की सुनीताने त्याला मृत्यूनंतर लग्न करून आयुष्यभर सोबत राहण्याचे आश्वासन देऊन त्याला फसवत होती. प्रेमाच्या मोहात तिने ही क्रूर हत्या केली. वीरपालच्या पाच मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आता त्याच्या वृद्ध आईवर आली आहे. गावात शोककळा पसरली आहे आणि प्रेमाच्या मोहात येऊन एका महिलेने स्वतःच्या पतीचा जीव घेतल्याने लोकांना धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.