Telangana CM Oath Ceremony Live Updates Saamtv
देश विदेश

Telangana CM Oth Ceremony: तेलंगणात 'काँग्रेस' राज! रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; उपमुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्याचाही शपथविधी

Telangana CM Oath Ceremony Live Updates: नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत बहुमत मिळवले. आज (गुरूवार, ७ डिसेंबर) तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Gangappa Pujari

Telangana CM Oath News:

नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत बहुमत मिळवले. आज (गुरूवार, ७ डिसेंबर) तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत १ उपमुख्यमंत्री आणि ८ मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय कॉंग्रेस नेत्यांनी हजेरी लावली.

तेलंगणात कॉंग्रेस 'राज'

तेलंगणाच्या नवीन मुख्यमंत्र्यासह नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळ आज पार पडला. रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह ११ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन रेवंत रेड्डी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

सोनिया गांधी- राहुल गांधींची उपस्थिती

या शपथविधी सोहळ्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी गुरुवारी सकाळी हैदराबादला पोहोचले आहेत. हैदराबाद विमानतळावर या सर्वांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.

रेवंथ रेड्डी दुसरे मुख्यमंत्री...

तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणाऱ्या रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना त्यांचे समर्थक 'टायगर रेवंत' असेही म्हणतात. रेवंथ रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री ठरलेत. रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने या निवडणुकीत बीआरएसच्या वर्चस्वाला धक्का देत तेलंगणाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात सत्ता मिळवली.

तेलंगणात विधानसभेच्या 90 जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 64 जागा मिळाल्या आहेत. तर 2014 पासून सातत्याने सत्तेत असलेली बीआरएस 39 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या विजयानंतर रेवंथ रेड्डी यांचेच नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT