Revanth Reddy: रेवंथ रेड्डी यांना मुख्यमंत्रीपद देण्यामागील 'ही' आहेत पाच कारणं, जाणून घ्या

Revanth Reddy CM For Telangana : रेवंथ रेड्डी यांना मुख्यमंत्रीपद देण्यामागील 'ही' आहेत पाच कारणं, जाणून घ्या
Why Was Revanth Reddy Given the Chief Ministership of Telangana? Here Are Five Reasons
Why Was Revanth Reddy Given the Chief Ministership of Telangana? Here Are Five ReasonsSaam Tv
Published On

>> मयूर सावंत

Revanth Reddy CM For Telangana :

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन राज्यात आपली सत्ता गमवावी लागली आहे. मात्र पक्षाला नव्याने एक राज्यात सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे, ते म्हणजे तेलंगणा. तेलंगणाच्या विजयाचे रेवंथ रेड्डीच शिल्पकार ठरलेत. केसीआर यांना जोर का झटका दिल्यानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदासाठी रेवंथ रेड्डी यांचंच नाव निश्चित करण्यात आलंय.

सुरूवातीला त्यांच्या नावाला काही नेत्यांनी विरोध केला होता. पण हायकमांडनं त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलाय. आपल्या नेते मंडळींपेक्षा हाय कमांडचा रेड्डी यांच्यावर इतका विश्वास कसा काय? मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचंच नाव का सुचवण्यात आलं? एक ना अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तर चला तर मग जाणून घेऊयात यामागील पाच कारणं?  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Why Was Revanth Reddy Given the Chief Ministership of Telangana? Here Are Five Reasons
Rajasthan New CM: वसुंधरा राजे याच मुख्यमंत्री होणार? आमदारांनी लावली त्यांच्या घरी रांग, हायकमांडचं टेन्शन वाढणार?

पहिलं कारण म्हणजे नव्या चेहऱ्याला संधी

काँग्रेस आता बदलतेय. कारण काँग्रेसने आता नव्या चेहऱ्याला संधी दिलीये. अशातच तेलंगणामध्ये काँग्रेसचं भविष्य म्हणून रेवंथ रेड्डी यांना पाहिलं जातंय. रेवंत रेड्डी यांचं वय 54 वर्ष आहे. त्यामुळं पुढील 15 ते 20 वर्षांपर्यंत रेवंथ रेड्डी काँग्रेससाठी उत्तम प्रकारे बॅटींग करू शकतात, असं म्हटलं जातंय. काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन युवा चेहऱ्यांना एक मॅसेज ण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेसमध्ये जुन्या नेत्यांचा दबदबा कायम आहे. या नेत्यांमध्येच रेवंथ रेड्डी यांचा नंबर लागतो आणि युवा नेतृत्वांमध्ये त्यांची लोकप्रियता अफाट आहे. त्यामुळं रेड्डी काँग्रेसला एक नवी दिशा देऊ शकतात, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणंय. (Latest Marathi News)

दुसरं कारण म्हणजे पक्ष संघटना

वर्ष 2024 मध्ये तेलंगणामधून काँग्रेसचं सरकार गेल्यानतंर हायकमांडने सत्तेसाठी अनेक नवे प्रयोग केलेत. यावेळी पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी रेवंत रेड्डी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. हाय कमांडनं त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. 2021 मध्येच त्यांना पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी दिली. त्यानतंर रेड्डी केसीआर यांचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरले. शहरं आणि ग्रामीण भागात त्यांनी पदयात्रा केली. तसंच कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलंय, असं सांगितलं जातयं.

Why Was Revanth Reddy Given the Chief Ministership of Telangana? Here Are Five Reasons
BJP New CM News: तीन राज्यांचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपच्या संसदीय मंडळाची उद्या बैठक; CM च्या नावांवर होणार चर्चा

तिसरं कारण म्हणजे विजयासाठी योग्य भूमिका

निवडणूकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याचे श्रेय रेवंथ रेड्डी यांना देण्यात आलंय. कारण केसीआर यांच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेसचं वर्चस्व स्थापन केलं. कर्नाटकात डीके शिवकुमार यांनी ज्याप्रमाणे काँग्रेसला बळकटी दिली. त्याचप्रमाणे तेलंगणात राजकीय मैदान गाजवण्याचं काम रेड्डी करणार असल्याचं मतं काही राजकीय विश्लेषकांनी मांडलंय.

चौथं कारण म्हणजे गांधी घराण्याशी जवळीक

रेवंथ रेड्डी ही व्यक्ती गांधी घराण्यासाठी एकदम विश्वासू मानली जाते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर विश्वासू नेत्यांमध्ये रेड्डी यांचा नंबर लागतो. त्यामुळं काही नेत्यांनी जरी त्यांच्या मंत्रीपदाला विरोध केला असला तरी गांधी घराण्याचा त्यांच्यावरील विश्वास कायम आहे. राहुल गांधी यांनी तेलंगणात ओवेसी आणि केसीआर यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. रेड्डी यांची गांधी घराण्यासोबत असलेली निष्ठा ही पक्षासाठी योग्य मानली जातेय.

पाचवं कारण म्हणजे कास्ट

रेवंथ रेड्डी हे तेलंगणच्या कास्टमध्ये पूर्णपणे फिट आहेत. त्यामुळे त्यांना हाय कमांडने मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. रेड्डी हे ज्या समाजातून येतात. तेथील सर्वात मोठा समाज हा तेलंगणात आहे. रेड्डी समाजाची संख्या ही 50 टक्के असली तरी, त्यांचा राजकीय प्रभाव अधिक आहे. वायएसआर यांच्या मृत्यूनंतर, रेड्डी समाज काँग्रेसपासून दूर जाऊ लागला होता. पण याच समाजाला एकत्र आणण्यात रेड्डी यांचा मोलाचा वाटा असल्याचं काहीचं मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com