Tamilnadu News Saamtv
देश विदेश

Tamil Nadu News: खळबळजनक! DIG C विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; ६ महिन्यांपूर्वीच स्विकारला होता पदभार...

2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले यावर्षी 6 जानेवारी रोजी डीआयजी म्हणून पदभार स्वीकारला होता.

Gangappa Pujari

DIG C Shivkumar Death News: तामिळनाडूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक (कोइम्बतूर श्रेणी) सी विजयकुमार यांनी शुक्रवारी सकाळी रेसकोर्स येथील त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये त्यांच्या सर्व्हिस पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

विजयकुमार सकाळी फिरायला बाहेर पडले आणि 6.45 च्या सुमारास त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये पोहोचले. कॅम्प ऑफिसमध्ये कर्तव्यावर असलेल्या इतर पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गोळी झाडून घेत आत्महत्या...

याबाबत अधिक माहिती अशी की, तामिळनाडूमध्ये कोईम्बतूर रेंजचे उपमहानिरीक्षक (DIG) सी विजयकुमार यांनी आत्महत्या केली. त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआयजी विजयकुमार यांनी सकाळी 6.15 च्या सुमारास शहरातील रेड फील्ड्समध्ये बांधलेल्या घरात स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले.

2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले यावर्षी 6 जानेवारी रोजी डीआयजी म्हणून पदभार स्वीकारला होता. याआधी, त्यांना पोलीस उपायुक्त, अण्णा नगर, चेन्नई आणि पोलीस अधीक्षक म्हणून, कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर येथे नियुक्त करण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला...

"विजयकुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा एसपीसह विविध जबाबदाऱ्यांमध्ये तमिळनाडू (TamilNadu) पोलिस दलाची चांगली सेवा केली होती. त्यांच्या निधनाने तामिळनाडू पोलिस विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.. अशा शब्दात मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT