Thalapathy Vijay Saaam tv
देश विदेश

आधी ज्योतिष्याला OSDपद, आता चित्रपट निर्मात्याची थेट कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं खळबळ

Tamil Nadu CM Joseph Vijay : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी घेतलेल्या अजून एका निर्णयानं खळबळ उडवून दिली आहे. आधी ज्योतिषीला मंत्रिमंडळात महत्त्वाचं पद दिल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी एका चित्रपट निर्मात्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

  • मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी के. वेंकट नारायणन यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली.

  • या पदाला कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष दर्जा असल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

  • विरोधकांनी या निर्णयावर तीव्र टीका करत सरकारच्या नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

तमिळनाडू सरकारच्या एका निर्णयामुळे नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते के. वेंकट नारायणन यांची नवी दिल्ली येथे तमिळनाडूचे 'विशेष प्रतिनिधी' म्हणून नियुक्ती केली आहे. या पदाचा दर्जा कॅबिनेट मंत्र्यासारखा असतो. या नियुक्तीवरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

चित्रपट निर्मात्यासाठी नवीन पदाचं निर्माण केलं

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार एका वर्षाच्या कालावधीसाठी हे पद निर्माण करण्यात आले आहे. मुख्य सचिव एम. साई कुमार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या नियुक्तीच्या उर्वरित अटी व शर्तींची घोषणा नंतर केली जाणार आहे.

नवी दिल्लीतील तामिळनाडूच्या विशेष प्रतिनिधीची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाला चालना देणे आहे. या पदावरील व्यक्ती मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकांच समन्वय करत असतो. त्या आयोजित करणं, केंद्र योजना आणि निधीवर नजर ठेवण्याची जबाबदारी यांच्यावर असते.

के. वेंकट नारायण कोण आहेत?

के. वेंकट नारायण हे बेंगळुरूस्थित 'केव्हीएन ग्रुप'चे (KVN Group) अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी रिअल इस्टेट आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी याआधी 'प्रेस्टिज ग्रुप'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम केले आहे. त्यांनी २०२० मध्ये 'केव्हीएन प्रॉडक्शन्स'ची (KVN Productions) स्थापना केली.

ही कंपनी सध्या 'जन नायकन' (Jana Nayakan) या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा मुख्यमंत्री विजय यांचा अखेरचा चित्रपट आहे. राजकारणात पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वीचा विजय यांचा हा शेवटचा चित्रपट असेल, असे मानले जात आहे.

विरोधकांची मुख्यमंत्र्यावर टीका

या नियुक्तीवरून विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला आहे. तामिळनाडूच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अशा महत्त्वपूर्ण पदावर एखाद्या चित्रपट निर्मात्याची नियुक्ती करणे ही त्या पदाच्या प्रतिष्ठेला कमी करणारी बाब आहे, अशी टीका द्रमुकचे (DMK) राज्यसभा खासदार पी. विल्सन यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT