Taiwan Earthquake  Saam Tv
देश विदेश

Taiwan Earthquake VIDEO: इमारती कोसळल्या, रस्त्यांना तडे-नागरिकांच्या किंचाळ्या; तैवानमधील भूकंपाचे VIDEO समोर

Japan Tsunami Alert: तैवानमध्ये झालेल्या भूकंपाचा व्हिडिओ समोर आला आहे. या भूकंपाची तीव्रता ७.५ रिश्टर स्केल होती.

Rohini Gudaghe

Taiwan Earthquake Video Viral

तैवानमध्ये (Taiwan) ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Taiwan Earthquake Videos) झाला आहे. या भूकंपाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भूकंपाचे धक्के अतिशय जबरदस्त होते. जमिनीपासून पाण्यापर्यंत सर्व काही थरथर कापल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. बरेच लोकं ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. या आपत्तीमध्ये एकाचा मृत्यू झाला आणि ५० जण जखमी झाल्याची माहिती मिळत (Earthquake Videos) आहे.  (Latest Marathi News)

भूकंपाच्या धक्क्यांमुळे रस्ते आणि पूल हादरू लागले. डोंगरांना तडे गेले तर समुद्रामध्ये उंच लाटा उसळू लागल्याचं समोर आलं आहे. घरांची दारे, खिडक्या यांना अचानक हादरू बसु (Taiwan Earthquake Videos) लागले. अचानक सर्व काही हादरत असल्याचं पाहून लोकांनी एकच आरडाओरडा करायला सुरूवात केली. लोकं जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पडले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस आणि प्रशासनाकडूनही नागरिकांना अलर्ट करण्यात आलं. आज सकाळी २५ वर्षातील सर्वात शक्तिशाली भूकंप तैवानमध्ये झाला आहे. तैवानमध्ये झालेल्या भूकंपाचा व्हिडिओ समोर आला (Japan Tsunami Alert) आहे. ते पाहून भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज येत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, या भूकंपामध्ये पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे इमारती कोसळल्या आहे. रस्त्यांना मधोमध तडे गेले आहेत.

तैवानची राजधानी तैपेई येथे आज सकाळी ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यावेळी भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या. या भूकंपामुळे शेजारील देश जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात (Taiwan Earthquake Video Viral) आलाय. जपानच्या ओकिनावा विमानतळावरील उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत. या भूकंपाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तैपेईच्या भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना (Earthquake News) दिलेल्या, तैवानमध्ये आज सकाळी आलेला भूकंप हा मागील २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप होता. यापूर्वी १९९९ मध्ये तैवानमध्ये आलेला भूकंप सर्वात धोकादायक होता. त्या भूकंपाची तीव्रता ७. ६ इतकी होती. त्यावेळी सुमारे २५०० लोकांचा बळी गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantanu Naidu Girlfriend : रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूकडून प्रेमाची कबुली; फोटोतील तरुणी आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Coconut Chikki Recipe :घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT