Taiwan Earthquake VIDEO : तैवान ७.२ तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपाने हादरला, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

Taiwan Earthquake, Tsunami Warning in Japan : भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या हुआलियन शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येते.
 Earthquake in Hingoli, Latur, Parbhani
Earthquake in Hingoli, Latur, Parbhani Saam tV

Earthquake in Taiwan :

तैवान शक्तीशाली भूकंपाच्या झटक्यांनी हादरला आहे. तैवानमध्ये सुमारे 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. त्यानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. तैवान सरकारने जारी केलेल्या अपडेटनुसार, बुधवारी पहाटे तैवानची राजधानी तैपेईमध्ये हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या हुआलियन शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येते.

या भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात 3 मीटर (9.8 फूट) उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जपानमध्ये त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे. लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. देशभरातील बचावकार्य पथकांना सतर्क करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Earthquake in Hingoli, Latur, Parbhani
Istanbul News: इस्तंबूल नाईट क्लबमध्ये भीषण आग, 29 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

सोशल मीडियातून समोर आलेल्या व्हिडीओनुसार, भूकंपानंकर अनेक इमारती कोसळल्या आहेत. पूल आणि रस्त्यांवरील वाहने हालताना दिसले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.

त्सुनामीचा इशारा दिल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. नागरिकांना सातत्याने हवामानाचे अपडेट्स दिले जात आहेत. पर्वतांच्या पायथ्याशी आणि समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे.

 Earthquake in Hingoli, Latur, Parbhani
India China Controversy: 'लबाड' चीनला भरला दम; अरुणाचलच्या ३० ठिकाणांची नावं बदलल्यावर भारत कडाडला!

भूकंप का येतात?

पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि त्यानंतर भूकंप होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com