Istanbul News: इस्तंबूल नाईट क्लबमध्ये भीषण आग, 29 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Turkey News: तुर्कीयेतील सर्वात मोठे शहर असलेल्या इस्तंबूल येथील नाईट क्लबमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे रिनोव्हेशनचे काम सुरू असताना लागलेल्या आगीत 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Istanbul News
Istanbul NewsSaam Tv

Istanbul News:

तुर्कीयेतील सर्वात मोठे शहर असलेल्या इस्तंबूल येथील नाईट क्लबमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे रिनोव्हेशनचे काम सुरू असताना लागलेल्या आगीत 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी क्लबच्या व्यवस्थापकासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील राज्यपाल कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, रुग्णालयात फक्त एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. मस्करेड नाईट क्लब अनेक दिवस बंद होता. इमारतीत रिनोव्हेशनचे काम सुरू होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Istanbul News
Sangli Lok Sabha: सांगलीच्या जागेचा तिढा वाढला! काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आक्रमक; पटोले यांना पत्राद्वारे थेट दिला इशारा

या घटनेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आले आहेत. शहराच्या युरोपीय भागातील बेसिकटास जिल्ह्यात ही आग लागली. आगीत मृत्युमुखी पडलेले सर्व कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा नाईट क्लब इमारतीच्या तळघरात होता. तुर्कीयेचे न्यायमंत्री यिलमाझ टुनाक यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Istanbul News
Yavatmal News: चुकीच्या उपचारांमुळे 13 वर्षीय मुलीचा गेला जीव? डॉक्टरांवर आई वडिलांनी केला गंभीर आरोप

तुर्कीचे न्यायमंत्री यिलमाझ टुनाक म्हणाले आहेत की, इस्तंबूलच्या बेसिकटास जिल्ह्यातील गेरेटेपे जिल्ह्यात लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्यांवर माजी श्रद्धांजली. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी मी पार्थना करत आहे. आगीप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तीन सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ये पुढे म्हणाले, आगीचे कारण शोधण्यासाठी तीन तज्ज्ञांचे पथक काम करत आहे. या घटनेप्रकरणी एकूण 5 संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व गोष्टींचा बारकाईने तपास सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com