Earthquake News Saam Tv
देश विदेश

Taiwan Earthquake News : ६.१ तीव्रतेच्या भूकंपाने तैवान पुन्हा हादरलं; नागरिकांमध्ये घबराट

Earthquake in Taiwan : महिनाभरापासून तैवानमधील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या महिन्यातील भूकंपाचा झटका बसलेली ही तिसरी घटना आहे. याची तिव्रता ६.१ रिश्टर स्केल नोंदवण्यात आलीये.

Ruchika Jadhav

तैवानची धरती भूकंपाच्या झटक्यांनी पुन्हा एकदा हादरली आहे. शनिवारी तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र झटके जाणवलेत. आज ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

महिनाभरापासून तैवानमधील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या महिन्यातील भूकंपाचा झटका बसलेली ही तिसरी घटना आहे. याची तिव्रता ६.१ रिश्टर स्केल नोंदवण्यात आलीये. या आधी महिन्याच्या सुरुवातीला देखील मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप असल्याची नोंद करण्यात आली होती. या भूकंपात १७ जणांनी आपला जीव गमावला होता.

भूकंपाचा केंद्रबिंदू देशाच्या पूर्व भागात

घटनेनंतर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या पूर्व भागात असल्याचं समजलं आहे. शनिवारी हाऊलिनला येथे भूकंप झाला. यासह तैवानची राजधानी असलेल्या तैपेईमध्येही एका इमारतीला मोठा हादरा बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 24.9 किलोमीटर खोलवर होता.

तैवानमध्ये नेहमी भूकंप होण्याचं कारण

तैवान, पेरू, चिली , जपान, कॅनडा अशा पॅसिफीक महासागराजवळील देशांमध्ये सर्वात जास्त भूकंप येतात. त्याचं सामान्य कारण 'रिंग ऑफ फायर' आहे.

रिंग ऑफ फायर म्हणजे काय?

जगातील सर्वात मोठा समुद्र म्हणजे पॅसिफीक महासागर. या समुद्रात 'रिंग ऑफ फायर' हा ज्वालामुखी आणि भूकंपाचा पट्टा आहे. या समुद्रात ४०,२५० किलोमीटर लांब भूकंपाचा पट्टा आहे. याच पट्ट्यात जपान हा देश सुद्धा येतो. त्यामुळे येथे नेहमीच जास्त भूकंपाचे झटके जाणवतात. या रिंग ऑफ फायरमध्ये तैवान व्यतिरिक्त अमेरिका, इंडोनेशिया, मेक्सिको, जपान, कॅनडा, रशिया, ग्वाटेमाला, चिली, पेरू आणि फिलीपिन्स सारखे देश देखील येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : अधिकार की लढाई में निमंत्रण नही भेजे जाते; छगन भुजबळांनी कुणावर साधला निशाणा? VIDEO

Mouni Roy Photos: अभिनेत्री मौनी रॉय साडीमध्ये दिसते खूपच हॉट, फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंच्या हस्ते दिपोत्सवाचं उद्घाटन

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचे शेरोशायरीतून अनुपस्थित काँग्रेस नेत्यांना टोला|VIDEO

Diwali 2025: फराळ नरम पडतोय? मग सोप्या टिप्स लगेचच करा फॉलो, महिनाभर टिकतील चकल्या अन् चिवडा

SCROLL FOR NEXT