तैवानमध्ये हल्लीच ७.२ तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. यात मोठ्या प्रमाणात वित्त आणि जिवितहानी झालीय. भूकंपच्या प्रमाण इतके भयानक होते की अनेक मोठं-मोठ्या इमारती कोसळल्या बरेच लोकं ढिगाऱ्याखाली गाडले गेले.या घटनेचे थरकाप उडणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.याच व्हिडिओमध्ये एका रुग्णालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय(Latest News)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवताना दिसत आहे. तैवानमध्ये जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हाचे हे दृश्य रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत. पुढे व्हिडिओत दिसते की ज्या वेळी भूकंप झाला त्यावेळी रुग्णालयाती एका रुममध्ये काही पाळण्यात नवजात लहान बाळं आपल्याला दिसत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यावेळी तिथे दोन नर्स उभ्या होत्या. काही क्षणात भूकंपाच्या धक्क्याने रुममध्ये असलेल्या बाळंकाच्या पाळण्यांना पकडतात. तसेच रुमच्या बाहेर असलेल्या इतर सहकार्यांना बोलावताना दिसत आहे.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.@Apex या एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ बहुतेक लोकांनी शेअर आणि फॉरवर्ड केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या रुग्णालयातील परिचारिकांचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.