Earthquake in China: चीनमध्ये मध्यरात्री मोठा भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या; आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू

China Earthquake News: या भूकंपात आतापर्यंत ९५ चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
China Earthquake News
China Earthquake NewsSaam TV
Published On

Earthquake in China

भारताच्या सीमेला लागून असलेल्या चीनमध्ये सोमवारी (१८ डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने शेकडो इमारतींची पझझड झाली. या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत १११ चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

China Earthquake News
HC On Reservation: सरकारी नोकरीतील आरक्षण बंद; MP मध्ये सासरवाडी असलेल्या महिलांसाठी हायकोर्टाचा मोठा निर्णय

चीनच्या वायव्येकडील गासू प्रांतात हा भूकंप झाला आहे. घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest News)

युरोपीयन भूमध्य भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. तर त्याची खोली अंदाजे १० किलोमीटर इतकी होती. भूकंपामुळे (Earthquake) चीनच्या गांसू-किंघाई सीमावर्ती भागातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. याठिकाणी मृतांची संख्या देखील जास्त आहे.

भूकंपामुळे झालेल्या नुकसानीमुळे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. चीनमधील (China) एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याने चीनच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने स्तर-IV आपत्ती निवारण आणीबाणी घोषित केली आहे.

आपत्तीच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि स्थानिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी चीनकडून एक टास्क फोर्स बाधित भागात पाठवण्यात आली आहे. या स्टास्कफोर्सने मंगळवारी पहाटेपासूनच बचावकार्याला वेग दिला आहे.

China Earthquake News
Horoscope Today: शनी-चंद्राच्या संयोगामुळे अशुभ योग; या राशींच्या व्यक्तींवर येणार मोठं संकट!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com