Swachh Bharat Mission Saam Digital
देश विदेश

Swachh Bharat Mission : 'स्वच्छ भारत'ने ७०००० बालमृत्यू टळले; चकीत करणारा अहवाल

Sandeep Gawade

स्वच्छतेच्या बाबतीत भारतीय नागरिकांमध्ये आणि व्यवस्थेमध्येही नेहमीच उदासीनता दिसून येते. शौचालयांची कमतरता, उघड्यावर शौच करण्याची सवय आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन न होणे ही साथीचे आजार पसरवण्याची प्रमुख कारणं आहेत. दूषित पाणी आणि अस्वच्छ परिसर यामुळे कॉलरा, डायरिया, आणि टायफाइड यांसारखे रोग पसरतात. मात्र स्वच्छ भारत मिशनअंतर्गत भारतात उभारण्यात आलेल्या शौचालयांमुळे आणि चांगल्या सुविधांमुळे 2014 ते 2020 दरम्यान दरवर्षी सुमारे 60,000 ते 70,000 बालमृत्यू टाळता आले आहेत, असं ‘नेचर’ने प्रकाशित केलेल्या जर्नलमध्ये म्हटलं आहे.

2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झालेल्या स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत 2020 पर्यंत 11 कोटीहून अधिक घरगुती शौचालये उभारण्यात आली आणि 6 लाखांहून अधिक खेड्यांना हगणदारी मुक्त करण्यात आलं. तर शहरांमध्ये 63 लाखांहून अधिक वैयक्तिक घरगुती शौचालये आणि 6.36 लाख सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत, असं सरकारी अहवालात म्हटलं आहे.

सुमन चक्रवर्ती, सोयरा गुने, टिम ए. ब्रुकनर, जुली स्ट्रॉमिंगर आणि पार्वती सिंग यांनी ‘स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय उभारणी आणि भारतातील बालमृत्यू दर’ या शीर्षकाखाली २ सप्टेंबरला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 2011 ते 2020 दरम्यान 35 राज्ये आणि 640 जिल्ह्यांमधील बालमृत्यू दर (IMR, म्हणजे एक वर्षांखाली 1,000 मुलांमागे मृत्यू दर) आणि 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू दर (U5MR) विचारात घेण्यात आला आहे.

2003-2020 दरम्यान बालमृत्यू दरात घट झाली होती, मात्र 2015 पासून यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 2003 मध्ये एका जिल्ह्यातील सरासरी शौचालय कव्हरेज 40 टक्क्यांपेक्षा कमी होतं आणि 2020 पर्यंत हे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा वाढलं. त्याचा बालकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला आणि बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाली. 30 टक्के शौचालय कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांमध्येही बालमृत्यू दरात लक्षणीय घट झालेली पहायला मिळाली आहे. सुमारे 60,000-70,000 बालमृत्यू दरवर्षी टाळण्यात यश आलं आहे.

“शौचालय आणि बालमृत्यू यांचा भारतात ऐतिहासिकदृष्ट्या जवळचा संबंध आहे. 2014 मध्ये स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीनंतर संपूर्ण भारतात वेगाने शौचालये उभारण्यात आली. त्यामुळे शौचालयांच्या उपलब्धतेमुळे दरवर्षी अंदाजे 60,000-70,000 बालमृत्यू टळले असावेत, असं अहवालात म्हटलं आहे.

करत पंतप्रधान नरेंद्र मोदी : “स्वच्छ भारत मिशन सारख्या प्रयत्नांच्या परिणामावर प्रकाश टाकणारे संशोधन पाहून आनंद झाला. बालमृत्यू कमी करण्यासाठी योग्य स्वच्छतागृहांची उपलब्धता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. स्वच्छ, सुरक्षित स्वच्छता ही सार्वजनिक आरोग्यासाठी गेम चेंजर बनली आहे आणि यात भारतील जनतेने पुढाकार घेतल्याचा मला आनंद आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेचरच्याचा हा अहवाल X वर पोस्ट करत म्हटलं आहे.

अभ्यासातील एक लेखक, आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेतील पोषण, आहार आणि आरोग्य विभागातील सहयोगी संशोधन फेलो सुमन चक्रवर्ती यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “भारतामध्ये मृत्यू टाळता येण्यासारख्या संसर्गजन्य रोगांमुळे बालमृत्यू आणि 5 वर्षाखालील मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. स्वच्छतेमध्ये सुधारणा झाली तर या रोगांचे प्रमाण कमी होते. स्वच्छ भारत मिशनने शौचालय बांधणीवर दिलेले लक्ष आणि संवादामुळे संपूर्ण भारतात शौचालय बांधणी आणि शौचालय वापर वाढला आहे आणि आमचे परिणाम म्हणून बाल आरोग्यात सुधारणा झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT