Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Dhanshri Shintre

स्किनकेअर प्रॉडक्ट्स

सुंदर आणि निर्दोष त्वचेसाठी अनेकजण विविध स्किनकेअर प्रॉडक्ट्स व चेहऱ्याचे उपचार वापरून त्वचेची विशेष काळजी घेतात.

घरगुती उपाय

चमकदार त्वचेसाठी अनेकजण दही, बेसन, मलई, तूप, दूध, केळी आणि नैसर्गिक स्क्रब यांसारखे घरगुती उपाय अवलंबतात.

नैसर्गिक चमक

चेहऱ्यावर बटर लावल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येतेच, शिवाय त्याचे अनेक अनोखे फायदेही अनुभवता येतात.

लोणी नैसर्गिक मॉइश्चरायझर

लोणी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून उपयुक्त असून त्यातील प्रथिने व व्हिटॅमिन ई त्वचेला पोषण देऊन अधिक मऊ व निरोगी ठेवतात.

सुरकुत्या कमी होतात

बटरमधील व्हिटॅमिन A आणि D त्वचेतील कोलेजन निर्मिती वाढवतात, ज्यामुळे सुरकुत्या कमी होऊन त्वचा तजेलदार व घट्ट दिसते.

डाग कमी होतात

चेहऱ्यावर बटर लावल्याने पिंपल्सनंतरचे डाग कमी होतात. नियमित वापराने त्वचा स्वच्छ, मऊ आणि डागमुक्त दिसू लागते.

कोरडेपणाची समस्या

कोरडी त्वचा असल्यास झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बटर लावा. यामुळे त्वचा मऊ राहील आणि कोरडेपणाची समस्या कमी होईल.

तेलकट त्वचा

संवेदनशील किंवा तेलकट त्वचेवर बटर लावू नये. यामुळे मुरुमे, अॅलर्जी आणि इतर त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

कोमट पाण्याने चेहरा धुवा

घरगुती बटर तयार करून चेहऱ्यावर लावा, अर्धा तास ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

त्रास होण्याचा धोका

चेहऱ्यावर बटर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा, त्यामुळे त्वचेला अॅलर्जी किंवा अन्य त्रास होण्याचा धोका कमी होईल.

NEXT: साखर नाही तर गूळ पण धोकादायक? अति सेवनामुळे होतील 'या' समस्या

येथे क्लिक करा