Sakshi Sunil Jadhav
मुंबईत गणेशोत्सवाची धामधुम मुंबईत सुरू झाली आहे.
सर्वांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या चिंतामणी गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे.
परळ वर्कशॉपमधून यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचे जल्लोषात आगमन झाले.
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, भजन-कीर्तनांच्या स्वरात आणि भक्तांच्या "गणपती बाप्पा मोरया" या जयघोषात बाप्पांचे स्वागत करण्यात आले.
रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीत आणि रोषणाईने सजवलेल्या रथातून चिंतामणी गणपतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
हजारो भाविक बाप्पाच्या आगमन सोहळ्यासाठी उत्साहात हजर आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.