SURAT MURDER CASE: WIFE AND LOVER ARRESTED FOR ALLEGEDLY KILLING HUSBAND AFTER STAGING SUICIDE Saam Tv
देश विदेश

Shocking : प्रेमात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला बॉयफ्रेंडच्या मदतीने दुसऱ्या मजल्यावरून फेकलं, नंतर रचला आत्महत्येचा बनाव

Surat Crime News : सुरतमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न पोलिस तपासात फसला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • सुरतमध्ये भयंकर घडलं

  • पत्नी आणि बॉयफ्रेंडने मिळून पतीची हत्या केली

  • सुरुवातीला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला

  • पोलिसांनी तपास करून कट उधळला

सुरत शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. वेद रोड परिसरात एका महिलेने आपल्या बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळ झारखंडमधील देवधर जिल्ह्याचे रहिवासी आणि सध्या सुरतमधील रहमतनगर येथे वास्तव्यास असलेले ४२ वर्षीय जन्मजयकुमार तीर्थ राय यांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुरुवातीला ही घटना अपघाती मृत्यू किंवा आत्महत्या असल्याचे भासवण्यात आले होते. मृताची पत्नी चांदनी कुमारी हिनेही पोलिसांना तशीच माहिती दिली होती.

मात्र, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर आली. मृताच्या मानेवर गंभीर जखम आढळून आली होती. तसेच मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि चौक बाजार पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात एका संशयित व्यक्तीची हालचाल आढळून आली. पुढील चौकशीत हा व्यक्ती शुलभ सिंग बंबहादूर सिंग असल्याचे समोर आले. शुलभ मृताची पत्नी चांदनी कुमारी हिचा बॉयफ्रेंड असल्याचेही उघड झाले.

पोलिसांच्या तपासानुसार, चांदनी कुमारी आणि तिच्या बॉयफ्रेंडचे विवाहबाह्य संबंध होते. दोघांना एकत्र राहायचे असल्याने त्यांनी जन्मजयकुमार यांना संपवण्याचा कट रचला. ७ जून रोजी जन्मजयकुमार झोपेत असताना चांदनीने त्यांना दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलले. मात्र खाली पडल्यानंतरही ते जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर शुलभ सिंगने रेझर ब्लेडने त्यांचा गळा चिरून हत्या केली.

यानंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तपासामुळे संपूर्ण कट उघडकीस आला. डीसीपी राघव जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या हत्येमागील इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT