Supreme Court final hearing on Shiv Sena and NCP symbol dispute : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी होणारे आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे. या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागलेय. अंतिम सुनावणीमध्ये नेमकं काय होणार? हे काही तासांत समजणार आहे.
निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलाय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेसेना आणि शरद पवार पक्षानं कोर्टात आव्हान दिलंय. ठाकरेसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केलेल्या याचिकांवर आज एकत्र सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालायने आज 11.30 वाजता मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रकरणांवर सुनावणी सुरु केली तरच निदान सुरुवात होऊन उद्या सुनावणी पुढे राहण्याची शक्यता आहे. जरी आता राष्ट्रवादीचा वाद ते आपसात सोडविण्याची तयारी करीत आहेत असे त्यांच्या आपसातील वागणुकीवरून आणि घडामोडींवरून दिसते तरीही शरद पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टातील याचिका परत काढून घेईपर्यंत त्यांचे राष्ट्रवादी पक्ष पळविण्याबाबतचे प्रकरण बोर्डवर येत राहिलच.
परंतु आज दुपारी एक वाजेपर्यंतच चीफ जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नियमित कोर्टातील कामकाज करतील कारण दुपारी एक वाजतापासून चीफ जस्टीस आणि न्या. जोयमाला बागची यांच्यासोबत गठीत करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे कामकाज करतील. अरावली डोंगर रांगा बाबत च्या केसची सुनावणी घेण्यात येईल त्यामुळे शिवसेना सत्तासंघर्ष- पक्ष पळविणे, धनुष्यबाण चिन्ह याबाबतची सुनावणी घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केले होते. यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे युती) सरकार अल्पमतात आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० आमदारांसह भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मागील काही वर्षांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. पुढील दोन दिवस या प्रकरणावर अंतिम सुनावणी होणार असल्याचे समजतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.